मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील दोन किराणा दुकानात अत्यावश्यक वस्तु असलेले पेट्रोल, डिझेल आदी स्फोटक पदार्थ विक्रीस ठेवल्या प्रकरणी
पोलीसांनी छापा टाकून १ लाख २ हजार ८२६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रविण सिध्देश्वर पाटील (वय २४), रमेश सिदमल बगले (वय२८ रा. नंदूर) या दोघा किराणा दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, नंदूर येथे दि. १३ रोजी सांयकाळी ४ वाजता स्टैंड जवळ असलेल्या रेवणसिध्देश्वर किराणा स्टोअर्समध्ये अत्यावश्यक वस्तु असलेले पेट्रोल व डिझेल ठेवून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच
यातील फिर्यादी पुरवठा निरीक्षक हणमंत पाटील यांनी सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे, पोलीस हवालदार महेश कोळी, पोलीस नाईक घोंगडे आदींनी भेट दिली असता
दुकानाच्या समोर २४ हजार ८३७ रुपये किंमतीचे ८४ लिटर पेट्रोल किंमतीचे चार कॅन मध्ये २३३ लिटर पेट्रोल तसेच 70 हजार 117 रुपये किमतीचे 750 लिटर डिझेल १६ कॅनमध्ये ठेवले होते.
एकूण ९४ हजार ९५४ रुपये किंमतीचे डिझेल, पेट्रोल असा मुद्देमाल आरोपी प्रवीण पाटील यांच्याकडे मिळून आला तर रमेश बगले यांच्याकडे ७ हजार ८७२ रुपये किमतीचे 84 लिटर पेट्रोल मिळून आले.
नंदुर परिसरात गेली अनेक वर्ष पेट्रोल डिझेल बेकायदा विक्रीचा गोरख धंदा,राजरुसपणे चालत असल्याचे या छाप्यानंतर माहिती नागरिकांमधून चर्चिली जात आहे.
यापुर्वी पोलीसांनी कधीच छापा न टाकल्यामुळे अवैध व्यवसायाला बळकटी मिळाल्याच्या तक्रारीचा सुर नागरिकामधून उमटत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज