mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर येथे गीर गाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 27, 2020
in सोलापूर
दीपावलीचा पहिला सण वसुबारस ‘या’ दिवशी कशी करावी गोमातेची पूजा.? जाणून घ्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्यावतीने सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या मास्क वापरणे, फिजिकल  डिस्टसिंग ठेवून सर्व नियमांचे पालन करून  गीरगाय पालन, कुक्कूट पालन व बंदिस्त शेळीपालन  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून  पंढरपूर व परिसरातील शेतकरी , नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार,

युवक व महिला बचत गट यांना स्वयंरोजगार मिळणेसाठी तसेच शेतीपूरक उद्योगांना चालना देवून प्रगतशील करणेसाठी व दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगार महिला व पुरूष यांच्यासाठी दि.30  डिसेंबर  ते 1  जानेवारी  2021 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पंढरपूर येथील श्री संत गाडगे महाराज मठ स्टेशन रोड  येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्याधिकारी डॉ.साधना उगले (मो.8208404208) यांनी दिली.

सध्या सेंद्रिय दुधाची वाढती मागणी, लोकांचे देशी गाईचे दूध खाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता देशी गायी पालनाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच बरेच शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत.

या तांत्रिक प्रशिक्षणामध्ये गीरगाय पालन, कुक्कूट पालन व शेळीपालन यामध्ये  जाती, निवड व प्रजनन, गीरगाय, कुक्कूट व शेळ्यांचा आहार, गोठा व्यवस्थापन (निवारा), चारा साठवण पध्दत, आजार, उपचार व नियंत्रण, शेळ्यांचे दूध-उपयोग, या सर्वाचे अर्थशास्त्र, या विषयी माहिती मिळणार आहे.

तसेच उद्योजकीय प्रशिक्षणामध्ये प्रभावी संवाद कौशल्य, कार्पोरेट मार्केटिंग, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, गीरगाय, कुक्कूट  व शेळी पालन पूरक उद्योगातील संधी, शासकीय व निमशासकीय कर्ज योजना व अनुदानाची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राच्या व नाबार्डच्या विविध योजनांची माहिती व प्रकल्प अहवाल तयार करणे आदि माहिती या प्रशिक्षणातून दिली जाणार आहे.

यामुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये स्वत:च्या व्यवसायाविषयी जनजागृती होणार आहे.निसर्ग व पाणी यामुळे शेतकरी सतत अडचणीत येत आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय हा उद्योग म्हणून उभारणी घेत नसल्याने यास पर्याय म्हणून पशुधन जोपासणे काळाची गरज आहे.

कमी चारा, कमी पाण्यात व कमी जागेत हा उद्योग प्रशिक्षण घेवून केल्यास बेरोजगारीची गंभीर समस्या मिटून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांना उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होत आहे.

या प्रशिक्षणासाठी पात्रता म्हणजे व्यवसाय करण्याची तीव्र इच्छाशक्ती आवश्यक आहे. या प्रशिक्षणासाठी फक्त 20 जागाच असणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे मर्यादित जागा असणारे हे प्रशिक्षण घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करावा, असे आवाहन डॉ.साधना उगले यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गिर गाईपंढरपूरप्रशिक्षणशेळी

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा फळवणीजवळ भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
Next Post
मंगळवेढा-पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता ?

मंगळवेढा-पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता ?

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा फळवणीजवळ भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा