mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येकानी कोरोना चाचणी करणे बंधनकारक; पोटनिवडणुकीचा निकाल येण्यास रात्र उजाडणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 29, 2021
in सोलापूर, मंगळवेढा
राजकीय धुळवड! भाजप-राष्ट्रवादीचे बडे नेते आज पंढरपुरात समाधान आवताडे,भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलंय.

शैला गोडसे,सिध्देश्वर आवताडे,स्वाभिमानी शेतकरी संघटने सचिन शिंदे, वंचित बहुजन आघाडीसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचं भवितव्य मतपेटीत कैद झालंय.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी रविवारी 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

परंतु या निकाल लागण्यास रात्र उजाडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोरोनामुळे 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे.त्यामुळेच निकाल येण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून, या निवडणुकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केलेय.

विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले असून, मतमोजणीसाठी 118 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्वतयारीबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक अरुण पवार उपस्थित होते.

मतमोजणी रविवार 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 14 टेबलांवर 38 फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल राखीव ठेवण्यात आलेत.

टपाली मतदानाच्या मोजणीसाठी दोन टेबल ठेवण्यात आलेत. तसेच 54 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस राखीव ठेवण्यात आलेत. टपाली मतदानाद्वारे 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी 3 हजार 252 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय.

तसेच 73 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचेही गुरव यांनी सांगितले.

मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच इतरांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी कोरोना चाचणी केली नाही, अशा संबंधितांसाठी मतदान कक्षाबाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाईल. तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी, निवडणूक निकाल ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात येणार नाही,वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता मतमोजणी कक्षा बाहेरील क्षेत्रात फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी, निवडणूक निकाल ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात येणार नाही. तो फक्त मतमोजणी कक्षात जाहीर करण्यात येईल.

फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकाल सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून वेळोवेळी प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी तसेच निकालासाठी वोटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) चा वापर करूनही पाहता येईल.

मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून, त्यानुसार मतमोजणीवर नजर राहणार आहे. तसेच या ठिकाणी व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे.

मतमोजणीच्या दिवशी अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतमोजणी केंद्रात आवश्यकती काळजी घेण्यात आली असून, यासाठी आरोग्य सुविधा कक्ष, प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष, तसेच आपत्कालीन परिस्थिीत सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दल तैनात करण्यात आले असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघमतमोजणी

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

सोलापुरात प्रेमविवाहानंतर हुंडा दिला नाही म्हणून पत्नीला घटस्फोटाची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2022
सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

May 19, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 19, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
Next Post
समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याऐवजी अश्रू आणण्याचे काम सरकारने केले; समाधान आवताडेंचा न्यायालयात जाण्याचा इशारा

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

सोलापुरात प्रेमविवाहानंतर हुंडा दिला नाही म्हणून पत्नीला घटस्फोटाची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2022
सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

May 19, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 19, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..