
मंगळवेढा टाईम्स टीम । करमाळा तालुक्यातील जिंती येथे एका व्यक्तीचा सारीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कातील काही जणांचे अहवाल स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. Corona to the hairdresser in Jinti in Karmala
या व्यक्तीचे केशकर्तनालयाचे दुकान आहे. त्याच्या संपर्कात आणखी कोण आले आहे का , याची माहिती प्रशासन गोळा करत आहे.
जिंती येथे एका व्यक्तीचा कोरोना संबंधित अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे . संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.




बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












