राजेंद्र फुगारे । पंढरपूर शहर व तालुक्यात आज बुधवार दि.१५ जुलै रोजी २० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात १४ तर ग्रामीण मध्ये ६ रुग्ण वाढले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली. The number of corona patients increased in Pandharpur city and taluka
सकाळी ८ वाजेपर्यंत आलेल्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण भाग निहाय खालील प्रमाणे
ग्रामीणमध्ये संपर्क व्यक्ती ५ यात ( करकंब, गोपाळपूर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक) तर जगदंबा नगर टाकळी येथे नवीन लक्षणे असलेला १ रुग्ण.
शहरांमध्ये एकूण १४ रुग्ण (त्यापैकी १३ संपर्क व्यक्ती तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण) संपर्क व्यक्ती महापूर चाळ संत पेठ पंढरपूर ५, गांधी रोड पंढरपूर १, संत पेठ १, घोंगडे गल्ली १, ज्ञानेश्वर नगर २, बागवान गल्ली सांगोला रोड ३, तर नवीन लक्षणे असलेला शांतीनगर,लिंक रोड १ रुग्ण.
पंढरपूरची एकूण रूग्ण संख्या ८४ झाली आहे.कोरोना संसर्गजन्य साथीला रोखावयाचे असल्यास प्रत्येक नागरिकांनी नैतिक जबाबदारी म्हणून घरामध्येच राहणे अतिमहत्वाचे आहे.नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज