मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने तालुक्यातील बोराळे व दामाजीनगर या गावातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 39 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 377 वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 4 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 8 रुग्णांला उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दिनांक 24/10/2020 रोजी नागरिकांचे स्वॅब (RT-PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेण्यात आलेले नाहीत. तसेच आज 17 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 17 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 2 आणि निगेटिव्ह 15 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरिक मौजे मंगळवेढा 1, दामाजीनगर 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅब(RT-PCR) चे 02 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत सदरचे नागरिक मौजे दामाजीनगर 1, बोराळे 1 येथील कोरोना रुग्णाच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 377 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 1 हजार 291 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज