टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी सध्या विविध अशा समस्यांच्या विळख्यात सापडलेले आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सध्या मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कालावधीत अनेक जणांचे मृत्यू देखील झाले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा न मिळाल्यामुळे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
पोर्टलवर विविध एंट्री भरण्यासाठी इतर तालुक्या प्रमाणे उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांना डाटा एंट्री ऑपरेटर देण्यात यावेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरणा ची बाधा झाल्यास शासकीय व खाजगी वैद्यकीय संस्थेत प्राधान्याने तात्काळ उपचार मिळावेत डेट्स ऑक्सिजन व्हेंटिलेटर अभावी आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून याची दक्षता घ्यावी
कोरोना टेस्टिंग करिता व लसीकरणासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.
या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले,तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,आरोग्य अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे यांच्याकडे दिले आहे.
यावेळी प्रमोदकुमार म्हमाणे, प्रदीप भोसले, चंद्रकांत पवार, मनोहर पाटील, सुनिल जाधव, जयसिंग हेंबाडे, बापूराव गांडुळे,
रूपाली तिऱ्हेकर, के.पी पाटील, उमा हुलवान, धानेश्वरी हिरेमठ, उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज