mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘या’ गावातील प्रत्येक ग्रामस्थांची होणार कोरोना तपासणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 27, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गावातील सर्वांचीच कोविड तपासणी केली जाणार असल्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी मरवडेकर सरसावले असून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचेही यावेळी ठरले. मरवडे येथे गेल्या पंधरा दिवसात साठहून अधिक रुग्णांना कोरोना विषाणूच्या महामारीला सामोरे जावे लागले आहे.

सध्या पन्नासहून अधिक रुग्ण मरवडे येथील कोविड सेंटर व विविध खाजगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत. याच कालावधीत मरवडे गावातील १० जणांचा विविध कारणांनी मृत्यूही झाला आहे.

प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी मरवडे गाव प्रतिबंधित करण्याचे आदेश काढले.मरवडे गाव प्रतिबंधित करण्यात आल्याने आज गाव कोरोनामुक्त करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

या बैठकीस तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे, मंडलाधिकारी चंद्रकांत घाडगे, तलाठी मधुकर वाघमारे, आरोग्यधिकारी भीमराव पडवळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे लतीफ तांबोळी, सरपंच सचिन घुले , स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे गटनेते संजय पवार , प्रहार शेतकरी संघटनेचे प्रा . संतोष पवार आदी उपस्थित होते.

या बैठकीत गावातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता गावातील प्रत्येक ग्रामस्थांची कोविड तपासणी करण्याचे ठरले. यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून यात ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

वाढदिवसाचा खर्च टाळून चोखामेळा नगरमध्ये औषध फवारणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळा नगर येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास पवार यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत ग्रामपंचायतीच्या सर्व प्रभागांमध्ये औषध फवारणी करून दिली.

मंगळवेढा शहरालगत असलेल्या दोन मोठ्या ग्रामपंचायतीमधील चोखामेळा नगर ही एक मोठी ग्रामपंचायत असून सात हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने आक्रमक पावले उचलली आहेत,

अशा परिस्थितीत उपसरपंच सुहास पवार यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत जवळपास १८०० लिटर औषधाची निर्मिती करून फवारणी करून घेतली आहे.

यावेळी रतनचंद शहा बँकेचे मॅनेजर शंकर वाकडे, दामाजी कारखान्याचे चीफ इंजिनिअर संजय भोसले, दिलीप हरपळे, श्रीराम शिंदे, शुभम शिंदे, प्रवीण शिंदे, मोहन जोंधळे, प्रभाकर कुमठेकर, रोहित भगरे, ओंकार भोसले, त्रिंबक चव्हाण, ग्रामविकास अधिकारी नागेश पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना चाचणीमरवडे

संबंधित बातम्या

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

February 19, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

February 18, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

उजनी पाणी प्रकरणात राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराची उडी! म्हणाले, पवार घराणं माझ्या हृदयात मात्र उजनीचे पाणी पळवू देणार नाही

ताज्या बातम्या

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

February 19, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

February 18, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..