टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शिवारात व तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या कडबा नुकसानीबद्दल शेतकऱ्यास अनुदान मिळावे तसेच कडबा विक्री करण्यासाठी
त्वरित जिल्हा बंदी उठवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार संघ अध्यक्ष अजित जगताप यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
मंगळवेढा शहर व तालुका शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांचा कडबा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. सरकारने जिल्हा बंदी घातल्यामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे कडबा भिजून नुकसान झाले आहे.
तसेच काही भागात कडब्याचे गंजीवरती विजा पडून अनेक शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा कडबा जळून खाक पडलेला आहे अशा परीस्थितीत शेतऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
ज्वारीचे दरही कमी झाल्याने सर्व उत्पादन खर्च वजा करता फक्त कडबांची रक्कम शेतकऱ्यांसाठी नफ्यात राहणार होती. परंतू सरकारने जिल्हा बंदी घातल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. बँकांचे, खाजगी सावकारांची कर्जाची रक्कम फेडणे अडचणीचे झाले आहे.
तरी तात्काळ सरकारने कडबा विक्रीची जिल्हा बंदी उठवावी व आवकाळी पावसामुळे झालेल्या कडबा नुकसानीचे पंचनामा करुन अनुदान द्यावे अशी मागणी अजित जगताप यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज