mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बँकेतील संचालकांनी काम करताना संस्थेचा चालक, विश्वस्त असे समजून काम करावे;  सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी दिला मोलाचा सल्ला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 8, 2024
in मंगळवेढा
बँकेतील संचालकांनी काम करताना संस्थेचा चालक, विश्वस्त असे समजून काम करावे;  सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी दिला मोलाचा सल्ला

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सहकाराची स्थापना देशपातळीवर झाली असती तरी सर्वात जास्त सहकार महाराष्ट्रात रूजला याचा सर्व महाराष्ट्रवासीयांना अभिमान असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी केले.

सहकारदिनानिमित्त मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा महिला नागरी सहकारी बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने रविवार दि.7 जुलै रोजी सहकार दिन साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिलीप पतंगे बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सीमा भगरे होत्या.

यावेळी पतंगे म्हणाले, सहकारात दररोज वेगवेगळे बदल घडत आहेत. शासनाला अंशदान द्यावे लागते. परंतू या गोष्टीला फेडरेशनचा विरोध आहे व राहील. दरवर्षी काही संस्थाना दोष दुरूस्ती अहवाल द्यावा लागतो. हे टाळायचे असेल तर संचालकानी आपले कर्तव्य चोखपणे बजावले पाहिजे.

पतसंस्थाचे कवच म्हणून फेडरेशन काम करीत असून या फेडरेनच्या माध्यमातून पतसंस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पतंगे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात मोठया सहकारी पतसंस्था मंगळवेढयात आहेत. यामध्ये धनश्री महिला पतसंस्थेचा आवर्जून उल्लेख केला जातो. महिला पतसंस्थेत महिलांनी आपले अधिकार व कर्तव्ये समजून घेतली पाहिजेत.

संचालकांनी प्रशिक्षणे, चर्चासत्र मेळावे आवर्जून अटेंड केली पाहिजेत. नवीन पतसंस्थेची सुरूवात चांगली झाली पाहिजे यासाठी कारभार पारदर्शक ठेवावा. नवीन पतसंस्थांनी सुरूवातीला छोटी कर्जे वाटप करावीत. मोठी कर्जे टाळावीत.

सुरूवातीला वाटलेले कर्ज वसुल होत नाही याची अनेक उदाहरणे आहेत. कर्ज देताना रोजचे उत्पन्न आणि परतफेड क्षमता तपासून पहा. कर्जदार आपल्या लाभासाठी असला तरी कर्जदाराचा लोभ ओळखून कर्जवाटप केले पाहिजे.

कारण थकबाकी वाढल्याने सर्वांचेच टेंशन वाढते. पतसंस्थेच्या संचालकांनी ही संस्था माझी आहे. मी या संस्थेच्या चालक आहे, विश्वस्त आहे. असे समजून काम करावे. मालक आपल्या डोक्यात घुसू देवू नये असाही मोलाचा सल्ला पतंगे यांनी यावेळी बोलताना दिला.

सदरप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून पतंगे यांनी सर्वांच्या शंकाचे निरसन केले.
सुरूवातीस सहकार भारतीचे माजी तालुकाध्यक्ष तात्यासाहेब चव्हाण यांनी प्रास्तविकात फेडरेशनच्या कार्याची माहिती देवून प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.

सुत्रसंचालन तात्यासाहेब चव्हाण यांनी केले. तर पतसंस्थेच्या व्इाईस चेअरमन अनुराधा लवटे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास पतसंस्था फेडरेशनचे वसुली अधिकारी संतोष वाळके,श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र कापशीकर, बळीराजा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अशोक वाकडे, संचालक श्रीधर भोसले, श्री कृपा महिला क्रेडीट सोसायटीचे ईश्वर जाधव,

यशोदा महिलापतसंस्थेच्या व्यवस्थापिका वैशाली गणेशकर, धनश्री मल्टिस्टेटचे शिवाजी शिंदे, निसर्गोपचार तज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन भोसले, कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या संचालिका सुवर्णा काशिद, महानंदा चव्हाण, मदिना इनामदार,

महानंदा सावळे, रेश्मा ढगे, सल्लागार रसिका हेंबाडे, अ‍ॅड.हसीना सुतार यांचेसह दिगंबर भगरे, लक्ष्मण नागणे, नामदेव काशिद, समाधान फुगारे, दावल इनामदार, संतनाथ ढावरे, प्रमोद बिनवडे, सचिन डोरले, नवनाथ सावळे, लहू ढगे, लक्ष्मण हेंबाडे, बालाजी टुले आदि उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेच्या प्र.व्यवस्थापिका करिश्मा मुलाणी, लिपिक साक्षी रणदिवे, वसुली अधिकारी सुहास भगरे आदिंनी परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत कान्होपात्रा महिला नागरी बिगरशेती पतसंस्था

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
Next Post

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेंनी मांडला बाजार; अर्ज भरताना घेतले पैसे; सोलापुर जिल्ह्यातील दोन नेट कॅफेंवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..