टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संदीपान भुमरे हे संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार आहेत.
तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासह यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड हे लोकसभा लढवण्याची शक्यता आहे.
इतकंच नाहीतर भावना गवळी यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. ‘काही लोकं जेष्ठ आहेत.
त्यांनी आता लोकसभेत जावं. असं काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील मत आहे. त्यामुळे तीन मंत्री तरी यंदा केंद्रात खासदारकीची निवडणूक लढवतील’, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं.
शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार आहे… या नावांची घोषणा लवकरच होईल. मुख्यमंत्री स्वतः त्या नावांची घोषणा करतील, असेही शिरसाट म्हणाले.
दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागात मोठे बदल केले असून सर्वसामान्य जनतेला याचा प्रत्यक्षात मोठा लाभ झालेला आहे. त्यांनी आतापर्यंत गोरगरीब लोकांसाठी आरोग्य विभागात नवनवीन योजना चालू केक्या आहेत.
याच कामाच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना केंद्रात संधी देऊ पाहत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे या दिवशीच मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे .त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज