टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरात लावण्यात आलेल्या विकेंड लॉकडाउनच्या आदेशात बदल. सर्व दुकानांसाठी आता सकाळी 7 ते संध्याकाळ 7 ऐवजी 8 वाजेपर्यंत परवानगी. तर शनिवार, रविवार बंद ऐवजी आता सर्व व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवता येणार.
हॉटेल, रेस्टॉरंट सकाळी 7 ते 8 पर्यंत सुरू राहणार तर होम डीलव्हरी साठी 10 वाजेपर्यंत परवानगी. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश जारी.
दरम्यान हा आदेश फक्त सोलापूर शहरासाठी लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुकाने हे शनिवार आणि रविवारी बंद असणार आहेत.
आयुक्तांनी सांगितले की, याआधीच्या आदेशानुसार शहरातील दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली होती.
हॉटेल, बार, रेस्टॉरंटची वेळ सायंकाळी आठपर्यंत होती. शनिवारी व रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सुधारित आदेशानुसार दोन एप्रिलपासून महापालिकेने शहरात नवीन नियमावली लागू केली आहे.
याअंतर्गत आता सातही दिवस सर्व दुकाने (मेडिकल, दवाखाने आदी अत्यावश्यक सेवा वगळता) सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
हॉटेल, खाद्यगृहे, पार्क, चौपाटी, परमीट रूम व बार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवावी. जेवणाची होम डिलिव्हरीची सेवा देण्याची वेळ ही रात्री 10 वाजेपर्यंत राहील असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज