mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हुलजंतीत रंगला महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्याचा भेटीचा नयनरम्य सोहळा; अशी झाली विशेष भाकणूक…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2022
in मंगळवेढा
बिरोबा-महालिंगराया गुरु शिष्याची आज हुलजंतीत भेट, लाखो भक्त दाखल; भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड उभा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मंगळवेढा तालुक्‍यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू-शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा आज उत्साहात रंगला.

भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत “महालिंगराया बिरोबाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

सोमवारी रात्री मुंडास बांधण्याचा सोहळा पार पडल्यानंतर आज दुपारी चारच्या सुमारास महालिंगराया मंदिरालगतच्या ओढ्यात महालिंगराया -बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालखीचा भेटीचा सोहळा रंगला.

महालिंगरायाच्या पालखीस शिरढोणचा बिरोबा- शिलवंती, बिज्जरगीचा बाळाप्पा, जिरअंकलगीचा बिरोबा, सोन्याळचा पांडुरंग- विठ्ठल यांनी भेट दिल्यानंतर महालिंगराया- बिरोबा या गुरू- शिष्याची भेट झाली.

नगारा व ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगराया पालखीस भेट देत असताना “महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आल्याने परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला.

या भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा आदी राज्यांतून सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक खासगी वाहनाने दाखल होऊन याची देही याची डोळा सोहळा अनुभवला.

महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्यासह अन्य देवतांच्या भेटीच्या सोहळ्यानंतर मंदिर परिसरात भाकणूक झाली.

अशी झाली भाकणूक

पालख्यांचा भेटीचा सोहळ्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भाकणुकीमध्ये एकमेकांचे फेटे फेकून दिल्यामुळे राजकारणात उलथापालची शक्यता असून खरीपात कमी तर रब्बी जास्त पाऊस तर पिक चांगले राहिल, रोगराईची शक्यता असून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याची भाकणूक वर्तवण्यात आले.

या भाकणुकीकडे भाविकांचे लक्ष लागून राहिलेले असते. सोलापूर व उंब्रजच्या भाकणुकीप्रमाणे येथील भाकणुकीलाही विशेष महत्त्व असते.

या भेटीच्या सोहळ्यास आमदार समाधान अवताडे,माजी सभापती सुधाकर मासाळ, ‘दामाजी’चे माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, सचिन शिवशरण, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, शिवाजी पटाप, सरपंच मीनाक्षी कुरमुर्ते, शिवानंद कुरमुत्ते, कामानंद हेगडे, शांताप्पा बिराजदार, विठ्ठल सरगर, संतोष चव्हाण यांनी भेट दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी यात्रेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महालिंगराया

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे ‘दिवाळी पाडवा’; जाणून घ्या याचे महत्व आणि शुभ मुहूर्त

साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे 'दिवाळी पाडवा'; जाणून घ्या याचे महत्व आणि शुभ मुहूर्त

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..