mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

युद्धबंदीला संमती! युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही; शस्त्रसंधीनंतर मोदी सरकारने ठणकावून सांगितलं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 11, 2025
in राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

भारताने 7 मे रोजीच्या मध्यरात्री 1.30 वाजता पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र टाकण्यात आले होते.

या हल्ल्यात केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं होतं, सर्वसामान्य नागरिकांना कुठेही लक्ष्य करण्यात आलं नाही. मात्र, या हल्ल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील विविध शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्ने केला.

मात्र, भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचा हा हल्ला नेतस्तनाबूत केला. त्यानंतर, दोन्ही देशातील तणाव अधिकच वाढला होता. एकीकडे सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करण्यात येत होता. दुसरीकडे हवाई हल्लेदेखील सुरू होते. अखेर,

काल सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. राज्याचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देखील ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मात्र, दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका कायम अशीच राहिल, असेही एस. जयशंकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच, 7 मे रोजी भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली होती, अखेर या युद्ध कारवाईला विराम मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. पाकिस्तानकडून 3.35 वाजता फोन आला,

त्यानंतर काल सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करुन युद्धविरामाची माहिती दिली. तसेच, दहशतवादाविरूद्धची भारताची भूमिका आजही कायम असल्याचे पाकिस्तानला ठणकावलं आहे.

”भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गोळीबार आणि सैन्य दलाच्या कारवायांना थांबविण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली आहे. पण, भारताने सर्वच ताकदीनीशी दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली. सैन्य कारवाया थांबल्या पण दहशतवादाविरुद्धची हीच भूमिका यापुढे देखील कायम राहिल”, असे ट्विट परराष्ट्रमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणावर होता. या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते. अखेर, या हल्लेखोरीला अखेर युद्ध विराम मिळाला आहे.

पाकिस्तानचा फोन आला, काय म्हणाले परराष्ट्र सचिव?

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजतापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काल, या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.”. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदीभारत पाकिस्तान युद्ध सुरू

संबंधित बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Next Post
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

उचेठाण येथील वाळू ठेक्यावर काळाबाजार, दररोजचा वाळूसाठा बोगस दाखवणे, पावती एडिट करून पाठवणे; ठेकेदाराकडून शासनाची सरळसरळ फसवणूक; प्रशासन गप्प का?

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा