mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार; ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 3, 2020
in राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा, रंग कोणता पुसू नका… समाजाला जातीपातींमध्ये अडकविणा-या वृत्तींना आपल्या हळुवार शब्दांनी माणुसकीचा संदेश या कवितेतून दिला आहे. आता वस्त्यावस्त्यांच्या नावांतून अस्तित्वात असलेली जातींची ओळख पुसून काढण्याचा निर्णय शासन घेणार असून या वस्त्यांना असलेली जातींची नावे हद्दपार केली जाणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाने या संबंधीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी, वस्त्यांची जातिवाचक नावे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत ती रद्द करावीत, अशी भावना व्यक्त केली होती.

पवार यांच्या त्या भावनेचा आदर करीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार त्या संबंधीचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे. जातिवाचक नावांमुळे त्या वस्त्या विशिष्ट समाजाच्या असल्याचे चटकन लक्षात येते.

ADVERTISEMENT

चांभारपुरा, ब्राह्मण आळी, कुंभार मोहोल्ला, तेलीपुरा, बारीपुरा, सुतार गल्ली आदी वस्त्यांची नावे शहरे अन् गावांमध्ये आजही आहेत. वर्षानुवर्षांच्या जातीप्रथेच्या खाणाखुणा या नावांद्वारे आजही दिसतात. या वस्त्यांची सरकारी रेकॉर्डवरील नावेही तीच आहेत.

त्यातून समाजात एकप्रकारची वेगळेपणाची भावना तयार होते. त्याला आता कायमचा छेद दिला जाणार आहे.

त्याऐवजी या वस्त्यांना महापुरुषांची नावे दिली जातील. अर्थात त्यासाठीचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेस असेल.नगरविकास आणि ग्राम विकास विभागातर्फे त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.

समाजातील जातीपातीच्या रेषा अस्फुट होत असताना विशेषत: राजकारणी लोकांनी आपल्या मतलबासाठी त्या गडद करीत नेल्या अशी टीका नेहमीच केली जाते. मात्र, आता महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी त्याला मूठमाती देण्याची स्वागतार्ह भूमिका घेतल्याचे यावरून दिसते.

कॉर्पोरेट क्षेत्र, एनजीओंद्वारे आयोजित परिषदा, परिसंवादांमध्ये सहभागी होणाºया प्रतिनिधींच्या नावाच्या पाट्या, त्यांना तेवढ्यापुरते दिली जाणारी ओळखपत्रं यात आडनावांऐवजी नावांचा उल्लेख केला जातो. शासकीय आयोजनांमध्येही तसे केले तर आडनावांवरून जात ओळखू पाहणाºया प्रवृत्तींना चाप बसेल. पुरोगामीत्वाच्या दिशेने ते आणखी एक पाऊल ठरू शकेल.

वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचे स्वागतच आहे पण ते केवळ नामबदलापुरते राहता कामा नये. विशेषत: मागासवर्गीयांच्या ज्या वस्त्या आहेत त्यांची नावे बदलताना आधुनिक नागरी सुविधा देऊन त्यांचे रुपडेही बदलले जावे.

सर्वच वस्त्यांमध्ये सर्व समाजांना सामावून घेण्याची प्रक्रियाही शासकीय व सामाजिक स्तरावर गतिमान करायला हवी. – डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

January 17, 2021
मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

काय सांगता ! होय, मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर मिळते 11 रुपयात चिकन बिर्याणी

January 16, 2021
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

धनंजय मुंडेंबाबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्वाचा निर्णय

January 15, 2021
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

January 14, 2021
बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘हा’ आजार अत्यंत धोकादायक

बर्ड फ्ल्यू! राज्यात हाय अलर्ट जारी; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘हा’ आजार अत्यंत धोकादायक

January 12, 2021
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

सुवर्णसंधी! पोलीस खात्यात तब्बल एवढ्या जागांसठी होणार भरती; गृहमंत्र्यांची घोषणा…

January 12, 2021
वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क झाले गायब, निम्मा महाराष्ट्र झाला नाॅट रिचेबल

चुकूनही करु नका 7 अ‍ॅप्संना डाऊनलोड, अन्यथा मिनिटात अकाऊंट होईल रिकामं

January 9, 2021
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

January 9, 2021
भीमा नदीकाठ गावांना धोक्याचा इशारा! उजनीतून भीमा पात्रात ‘एवढ्या’ लाख क्यूसेसचा विसर्ग

येत्या काही तासांत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज, या 10 जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्याची शक्यता

January 8, 2021
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

ताज्या बातम्या

प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

January 18, 2021
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

January 18, 2021
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले,वाचा सविस्तर

January 17, 2021
नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

January 17, 2021
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

मंगळवेढा ब्रेकिंग! ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, ‘एवढ्या’ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार

January 17, 2021
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढा नगरपालिकेची हद्दवाढ होणार, बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी : नगराध्यक्षा अरुणा माळी

January 17, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News