टीम मंगळवेढा टाईम्स ।
सरपंच यांना नळाला पाणी का सोडत नाही अशी विचारणा केली असता तुम्ही मते आम्हाला काय फुकट दिली आहेत काय
असे म्हणून एका 22 वर्षीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी
विवेक तुकाराम खिलारे, दादा खिलारे, निसार पठाण, अमोल मेटकरी, अशोक जाधव, शरद हेंबाडे, उत्तम सावत, बाबा सय्यद, बाळू जाधव, भिमराव लटके, लाला चौगुले (सर्व.रा.डोंगरगांव)यांच्याविरूध्द
अनुसूचित जाती अनू. जमाती कायदयानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी पुजा नवनाथ साखरे (वय 22) ह्या दि.3 रोजी सायंकाळी 5.00 वा.
शेजारी राहणार्या सुशिला सोनवले अशा दोघी शिवाजी जाधव यांच्या शेतात जनावरासाठी गवत आणण्यासाठी जात असताना
डोंगरगावचे सरपंच विवेक तुकाराम खिलारे यांना फिर्यादीने पाणी का सोडत नाही असे विचारले असता तुम्ही मतं आम्हाला काय फुकट दिली आहेत काय,
माझे 30 लाख रुपये गेले असून ते वसुल करणार आहे. मग पाण्याचे काय असेल ते बघू असे म्हणाल्यावर यावेळी फिर्यादी सरपंचांना असे का बोलता
असे विचारले असता जातीवाचक बोलून ये कुत्रे तुम्हाला हिसका दाखवून जाळून टाकीन असे फिर्यादीस म्हणून गावातील वरील आरोपींना फोन करून बोलावून
गैर कायदयाची मंडळी गोळा करून शिवीगाळ,दमदाटी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील ह्या करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज