टीम मंगळवेढा टाईम्स । कामाची पगार देतो असे सांगून संतोष महादेव कोळी (वय २२) याला विषारी शिंदी पाजून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी मलकाप्पा मल्लाप्पा बिराजदार , म्हांतेश मल्लाप्पा बिराजदार (रा.सिध्दापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी ,यातील मयत संतोष महादेव कोळी हा फोटोग्राफर असून तो आरोपी यांच्याकडे कामाला होता. यातील आरोपी मलकाप्पा बिराजदार व म्हांतेश बिराजदार यांनी मयतास घरातून बोलावून घेवून त्यास विषारी शिंदी पाजून त्यानंतर मयतास संतोष सोनगे याच्या शेतात नेवून दुकानाची चावी मागितली असता मयतास पगार दिल्याशिवाय चावी देत नाही.
असे म्हणाल्याने दि.१२ रोजी ८.०० च्या दरम्यान आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला असल्याची फिर्याद महादेव कोळी याने पोलिसांत दिली आहे.या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे हे करीत आहेत.
A case has been registered against both of them in the murder case of a young man on sidhdapur mangalwedha
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज