टीम मंगळवेढा टाईम्स ।
अॅट्रॉसिटीची केस माघारी घेतो तुला त्रास देत नाही असे म्हणून 50 हजाराची खंडणी मागून खोट्या तक्रारी करण्याची धमकी दिल्या प्रकरणी
धोंडीबा कुंडलीक साखरे, बाबासाहेब अब्बीर सय्यद, शब्बीर जाफर सय्यद (सर्व रा.डोंगरगाव) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी मधूकर राजाराम मोरे (रा.डोंगरगाव) हे दि.14 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मंगळवेढा शहरातील मेटकरी चहाचे कँटीन समोर
फिर्यादी व फिर्यादीचा मामा शंकर हेंबाडे, दर्लिंग नारायण क्षिरसागर असे बोलत थांबले असताना वरील आरोपींनी येवून मी तुझ्यावर केलेली अॅट्रॉसिटीची केस माघारी घेतो,
तुला त्रास देत नाही, तु मला पन्नास हजार रुपये दे असे म्हणाल्यावर फिर्यादी त्यास म्हणाला, तुम्हांला कशासाठी पैसे द्यायचे असे म्हणताच
तुझ्यावर पुन्हा एकदा खोटा विनयभंगाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी देवून आरोपी तेथून निघून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत मोरे यांनी म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज