टीम मंगळवेढा टाईम्स।
काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचभौतिक महोत्सव कणेरी मठ कोल्हापूर येथे ५०० एकर जमिनीवर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मारापूर, ता. मंगळवेढा येथील सर्व शेतकरी बांधव, तरुण मित्र, महिलावर्ग यानी २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता ग्रामपंचायतच्या वतीने मोफत शेतकरी सहलआयोजित केली आहे.
ग्रामपंचायत मारापूर या ठिकाणाहून सदर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जाणार असून नावनोंदणी १५ फेब्रुवारी पर्यंत करावी, असे सरपंच विनायक यादव यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने हे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एक बस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
आपणास दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी, मेंढी पालन, विविध प्रकारच्या पाले भाज्यांच्या बियाणे, ऊस शेतीतील तंत्रज्ञान, तसेच सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीचे प्रात्यक्षिक त्यातून मिळणारे उत्पादन शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे.
त्यामधून भरपूर गोष्टी शिकावयास मिळणार आहेत. जवळपास २०० आयुर्वेदिक डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
या कृषी प्रदर्शनाला दररोज ५ ते ६ लाख नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. असा देशपातळीवर पहिला प्रयोग कणेरी मठ कोल्हापूर येथे होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज