टीम मंगळवेढा टाईम्स । टेंभुर्णी येथील कुडूवाडी बायपास रोड पुलाखाली गांजा विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ४ व्यक्तींना टेंभुर्णी पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून गांजासह सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Cannabis seized in Tembhurni, goods worth Rs 6 lakh seized
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार ( नंबर एम एच ०६ सीबी ३५७३ ) मध्ये विक्रीसाठी | घेऊन चाललेला सुमारे ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा गांजा टेंभुर्णीत पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला.
कुडूवाडी रोडवरती टेंभुर्णी बायपास पुलाखाली एका कारमध्ये गांजा घेऊन काही व्यक्ती विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याची खबर मिळाली. त्यानंतर सापळा रचून टेंभुर्णी पोलिसांनी प्रशांत बिभीषण उकरंडे ( वय २३ ) , अविनाश चंद्रकांत हरकरे ( वय ३० ) , समाधान दिलीप हलकरे ( वय ३० ) व जासम मोहम्मद जीमल शेख ( वय २२ ) सर्व राहणार तेरखेडा , यांना अटक करण्यात आली.
यांच्यावर कलम ५०४/२०२० एनडीपीएस क्ट १ ९ ८५ चे कलम २० ( ब ) नुसार टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल , रोख रक्कम २ हजार ६१० रुपये व मारूती स्विफ्ट कार असा एकूण ६ लाख १७ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज