mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! विधानसभेआधी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ‘या’ आमदारांची नावं चर्चेत; सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश होणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 17, 2024
in राजकारण, राज्य
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

टीम मंगळवेढा टाईम्स। 

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. लोकसभेत महायुतीला म्हणावं असं यश मिळालं नाही. त्यामुळे आता युतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोर लावला आहे.

काहीही करुन मित्र पक्षातील नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी ओढावून घ्यायची नाही. यासाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत.

अशातच आता अनेक दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारदेखील लवकरच केला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे युतीतील नेमकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागणार याची उत्सुकता आमदारांना लागली आहे.

निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि यासाठी तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. बऱ्याच काळापासून राज्यमंत्रिपदाचा विस्तार झाला नाही. अनेक आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. तर वरिष्ठांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होऊ शकतो. तर पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. तर राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर कोणत्या नेत्यांची वर्णी मंत्रीपदी लागू शकते याबाबतची काही नावे चर्चेत आहेत.

‘या’ आमदारांची नावे चर्चेत

यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आशिष जैस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासह यामिनी जाधव आणि लता सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

भाजपकडून मंत्रिमंडळ वर्णी लागण्याच्या चर्चेत आमदार नितेश राणे, मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी, संजय कुटे, राणा जगजीत सिंह पाटील आणि देवयानी फरांदे यांची नावे आहेत.

येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल असं बोललं जात आहे. त्यामुळे आता कोणत्या नेत्याला मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंत्रिमंडळ विस्तार

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
Next Post
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या 10 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब; जादू टोण्याच्या संशय?

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा