टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील घरफोडी उघड करण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले असून यामध्ये चोरीला गेलेले ७५ हजाराचे सोने जप्त केले आहे.
दि.१ ऑक्टोबर २०२२ रोजी बलभिम एकनाथ लवटे (रा.खडकी, ता.मंगळवेढा) हे त्याच्या घराला कुलूप लावून सांगोला येथे गेले असता
दुपारी २.३० ते सायंकाळी ७.३० वा. दरम्यान त्याच्या बंद घराचे दरवाज्याचे कडी-कोयडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून
बंद घरातील कपातील सोन्याचे दागिने हे चोरून नेल्याबाबतची तक्रार मंगळवेढा पोलीस ठाण्यास दाखल होती.
त्याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांचे तपास टिम तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी जयवंत दिलीप काळे (वय ३५, रा.खडकी, ता.मंगळवेढा) शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्यात अटक केली.
आरोपीकडे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदर आरोपीने सदर घरातील सोन्याच्या दागिने हे चोरून नेल्याबाबत कबुली दिली असून सदर आरोपीकडून पंचनाम्याद्वारे चोरी केलेले दागिने काढून दिले.
त्यामध्ये ७५ हजार किंमतीच्या तीन पिवळ्या धातूचे प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कामगिरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीत माने व
त्याचे पथकातील सपोनि बापू पिंगळे, पोसई धापटे, पोहेकॉ कोळी, पोहेकॉ मोरे, पोहेकॉ पठाण, पोहेकॉ हॅबाडे, पोना काळे, पोना मारे, पोका मिसाळ, पोकों घायाळ, पोकॉ आवटे, पोका कदम यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज