mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बी. एस्सी. नंतर पॅथॉलॉजी कोर्समध्ये करिअरच्या संधी; आता सांगोल्यातील फॅबटेक कॉलेजमध्ये सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2021
in शैक्षणिक, राज्य
बी. एस्सी. नंतर पॅथॉलॉजी कोर्समध्ये करिअरच्या संधी; आता सांगोल्यातील फॅबटेक कॉलेजमध्ये सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

समाज जिवनामध्ये सर्वसामान्य लोकांना आपल्या आरोग्यासंबंधी काही गोष्टी माहित असाव्यात आणि आजाराचे योग्य निदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब्रॉटरीची निवड करण्या इतपत त्यांना माहिती करणे हा यामागचा उद्देश आहे. वैद्यकीय ज्ञानाचा मार्ग हा पॅथॉलॉजी संग्रहालयातून जातो औषध विक्रेत्याच्या दुकानातून नाही हे प्रामुख्याने आपण  समजून घेतले पाहिजे.

या जगात रुग्णालये ही वैज्ञानिक (शास्त्रोक्त ) वैद्यकशास्त्राचे फक्त प्रवेशद्वार आहे. प्रथम निरीक्षण  क्षेत्र आहे, ज्यामध्ये डॉक्टर येतात पण वैद्यकीय शास्त्राचे खरे आश्रयस्थान आहे ते लॅब्रॉटरीज, फक्त तिथेच प्रायोगिक विश्लेषणाची साधने वापरून सामान्य आणि पॅथॉलॉजीकल अवस्थांमधील आयुष्याचा शोध घेतला जातो.

पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला लॅब टेस्टिंग बद्दल  वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. लॅबमध्ये टेस्ट करून लॅब टेक्निशियन डॉक्टरला आजाराचे निवारण करण्यास मदत करतो.

पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला (anatomy), शरीररचना,(physiology) शरीरशास्त्र,  (microbiology) सूक्ष्मजीवशास्त्र,(biochemistry) जीवनशास्त्र,( hematology) रक्तवाहिन्यासंबंधी विषय शिकवले जातात. शरीरशास्त्रात (Anatomy) तुम्हाला हाडे आणि शरीराच्या अवयवांबद्दल शिकवले जाते.

(Physiology) शरीरविज्ञान मध्ये आपल्याला विविध महत्वाच्या अवयवांबद्दल शिकवले जाते. सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) मायक्रोबायोलॉजीमध्ये आपल्याला बॅक्टिओलॉजी, विषाणूशास्त्र, परजीवी विज्ञान, बुरशीचे आणि डाग-डागांबद्दल शिकवले जाते.

जीवनशास्त्र (Biochemistry) जीवशास्त्रात तुम्हाला अजैविक रसायनशास्त्र, द्रावण तयार करणे, सेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरासायनिक नमुना संग्रह, प्लाझ्माचे पृथक्करण, मूत्र आणि मलची रासायनिक तपासणी याबद्दल शिकवले जाते.

(Pathology) पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला नमुने गोळा करणे, एचबी, आरबीसी गणना, लेबलिंग, अहवाल देणे आणि अहवाल पाठविणे शिकविले जाते.

यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि, पीजी डीएमएलटी कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवले जाईल. लक्षात राहू द्या कि, हा फक्त अभ्यासक्रमाचा सारांश आहे, तुम्हाला पीजी डीएमएलटी  कोर्समध्ये याबद्दल भरपूर काही शिकवले जाईल.

पीजी डीएमएलटी कोर्स पूर्ण झाला म्हणजे तुम्ही लॅब टेक्निशीन म्हणून काम करण्यासाठी पात्र होतात. कोर्स झाल्यावर तुम्ही नोकरी करू शकता.  तुम्हाला लॅब टेक्नॉलॉजिस्ट, लॅब टेक्निशिअन, किंवा लॅब वर्कर म्हणून नोकरी भेटेल.

तसेच तुम्ही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये नोकरी करू शकता. नर्सिंग होम मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करू शकता. फार्मा कंपनी किंवा मेडिकल कंपनीच्या वेगवेगळ्या लॅबमध्ये काम करू शकता.

तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये देखील काम भेटते. हा कोर्स 1.5 वर्षाचा असून त्यात २ सेमिस्टर्स असतात. या सेमिस्टर नंतर 6 महिन्याची इंटर्नशिप सरकार मान्य पॅथॉलॉजी लॅबमध्ये करावी लागते.

भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षित डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, पॅथॉलॉजिस्ट या सर्व घटकांची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्राश्वभूमीवर अवघे जग चिंताग्रस्त असून रुग्णांना अतिजलत सर्व ते उपचार मिळणे आवश्यक आहेत. याबरोबरच वैद्यकीय मनुष्यबळ यामध्ये सर्व प्रकारच्या कोरोना योध्याची आवश्यकता भासत आहे.

या सर्व बाबींची आवश्यकता पाहता फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी आपल्या कॅम्पसमध्ये पीजी डीएमएलटी या कोर्से करिता प्रयत्न सुरु केले असून लवकरच याला शासनाची  मंजुरी मिळेल.

हा लेख लिहण्यामागे हा हेतू आहे कि, सध्या बी. एससी. पास आऊट विद्यार्थी मोठ्या संख्येने बेरोजगार आहेत. यातील काही विद्यार्थी हा कोर्से पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी करू शकतात किंवा आपली स्वतःची लॅब टाकू शकतात .

या कोर्सकरिता पात्रता हि बी.एस्सी.पदवी असावी लागते. यामध्ये बॉटनी, मायक्रोबियॉलॉजि, झूलॉजि, केमिस्ट्री, बायोलॉजि, बायोटेक्नॉलॉजि यापैकी कोणत्याही एका विषयाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त मॅथ्स व फिजिक्स हे विषय सोडून इतर सर्व विद्यार्थी या कोर्सकरिता पात्र ठरतात.

लेखक: डॉ.संजय बैस,प्राचार्य, फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी,सांगोला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फॅबटेक कॉलेज

संबंधित बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

ZP., पंचायत समित्यांत ‘स्वीकृत सदस्य’ येणार? अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींचा अनुभव जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी होणार

January 25, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

भयंकर! महिलेने Ex अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं; मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

January 24, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! पंचायत समिती उमेदवारी अर्जासाठी मागितली लाच; महसूल सहायकाला रंगेहाथ पकडले

January 23, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

January 22, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! e-KYC बद्दल मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट

January 23, 2026
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

राजकीय भूकंप होणार? पुढील ८ दिवसांत उलटफेर होणार; महापौरपदाच्या वादादरम्यान बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

January 21, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
जिल्ह्यात वस्तुंच्या अवैध साठेबाजीसाठी गावस्तरावर समित्या

खळबळ! साहेब आता तिकीट द्या, नाहीतर दोरी द्या, इथंच…. समर्थकाची अजब मागणी

January 19, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी; वायचळ यांची बदली

पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव जिल्हा परिषदेत एकमताने मंजूर

ताज्या बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

ZP., पंचायत समित्यांत ‘स्वीकृत सदस्य’ येणार? अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींचा अनुभव जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी होणार

January 25, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला; अवैध धंद्याची माहिती स्थानिक पोलीसांना कशी काय होत नाही?

January 25, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

राजकीय घडामोड! जिल्हा परिषद दामाजी नगर गटातून ‘या’ बड्या नेत्यानी घेतली माघार; पहिल्याच दिवशी एकमेव अर्ज मागे

January 24, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

भयंकर! महिलेने Ex अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं; मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

January 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा