टीम मंगळवेढा टाईम्स ।
माहेरहून ३० तोळे सोने घेऊन ये व दर महिन्याचा किराणा भरून दे असे म्हणत सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंदरगाव येथे बुधवारी ही घटना घडली.
ऋतुजा प्रशांत ढगे (वय २५) असं आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. मृत ऋतुजा यांच्या आई दमयंती बोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी
नवरा प्रशांत अशोक ढगे, सासू शोभा अशोक ढगे, सासरा अशोक मुरलीधर ढगे (तिघे रा.मंगळवेढा) व ननंद प्रियंका निशांत घडगे (रा.अजनसोंड ता. पंढरपूर) यांच्यावर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतुजा हिचा २९ जानेवारी २०२० मध्ये मंगळवेढ्यातील प्रशांत ढगे याच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षे ऋतुजाला चांगले सांभाळले. मात्र २०२२ मध्ये मुलगा झाल्यानंतर ऋतुजा ला सासरच्या मंडळीने त्रास सुरू केला.
४ जून २०२४ रोजी ऋतुजाच्या आई व वडिलांनी ऋतुजा ला उंदरगाव येथे आणले होते. ५ जून रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास घरातील फॅनला ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात भादवी 498 (अ), 304 (ब), 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज