टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात भ्रष्ट मार्गाने पैसा कमविणार्या शासकीय कर्मचार्यावर व त्याच्या पत्नीवर पहिलाच गुन्हा दाखल झाला असून भ्रष्टाचार करणार्यामध्ये खळबळ उडाली आहे.
शासकीय कार्यालयात सध्या दबक्या आवाजात मोठी चर्चा होत आहे. यापुढे भ्रष्ट मार्गाने पैसा कमविणार्या अधिकारी व कर्मचार्यावर लाचलुचपत विभागाने आपली करडी नजर ठेवून भविष्यात अशाच कारवाई केल्यास सर्व शासकीय कार्यालयामधून होणारा भ्रष्टाचार हद्दपार होण्यास मदत होणार असल्याच्या प्रतिक्रीया सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत आहेत.
तहसील कार्यालय, पंचायत समिती व राष्ट्रीय महामार्ग ज्या हद्दीतून गेलेत त्या शेतकर्यांना मिळणार्या पैशाच्या मोबदल्यात सोलापूर व मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग कार्यालय येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात घेवून
शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याने या कार्यालयावरही लाचलुचपतने कारवाई करुन येथील भ्रष्टाचार थांबवावा असा सूर कृषी सहाय्यकाच्या केलेल्या कारवाईवरुन नागरिकामधून पुढे येत आहे.
मंगळवेढा तालुक्यात कृषी सहाय्यक काशिनाथ यलाप्पा भजनावळे हे येथे कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची 14 लाख 93 हजार 817 रुपये अशी
अपसंपदा संपादीत केल्याप्रकरणी सोलापूरच्या लाचलुचपतच्या विभागाने पती-पत्नी विरुध्द गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील आरोपी काशिनाथ यलाप्पा भजनावळे (वय 50) हे मंगळवेढा तालुक्यात कृषी सहाय्यक पदावर मार्च 1995 ते माहे 2014 मध्ये कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांची पत्नी आरोपी किशोरी काशिनाथ भजनावळे (रा.सिध्दापूर) यांचे नावे संपादीत केलेल्या
एकत्रीत अपसंपदा रक्कम 14 लाख 93 हजार 817 रुपये इतकी असून लोकसेवक काशिनाथ भजनावळे यांनी त्यांच्या पत्नीचे ज्ञात उपत्न्नाशी एकत्रीत टक्केवारी काढता 17.14 % इतकी अपसंपदा प्राप्त केल्याने स्वत:चे कब्जात बाळगून ठेवली असल्याने पती-पत्नी विरुध्द लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज