मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कोरोना विषाणूच्या प्रसाराबद्दल आणखी एक खुलासा झाला आहे ज्यामुळे जगातील सरकारे आणि वैद्यकीय तज्ज्ञांची झोप उडू शकते. शांघायमधील अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू आता हवेमधील सुक्ष्म कणांमध्ये प्रवेश करून संक्रमित होत असल्याचे म्हटले आहे. हवेतून प्रवास करून विषाणू दुसर्या व्यक्तीस संक्रमित करीत आहे, ज्याला एरोसोल ट्रान्समिशन म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत केवळ विषाणूचे थेट ट्रान्समिशन (कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन) आणि कॉन्टॅक्ट ट्रान्समिशनची पुष्टी केली गेली आहे. (म्हणजे या माध्यमातून विषाणूची लागण होते)
शांघाय सिव्हिल अफेअर्स ब्युरोचे उपप्रमुखांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की ‘एरोसोल ट्रान्समिशन म्हणजे व्हायरस हवेत असलेल्या सुक्ष्म कणांना मिळून एरोसोल तयार करतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की थेट प्रसाराचा (डायरेक्ट ट्रान्समिशन) अर्थ असा आहे की जर एखाद्या संक्रमित व्यक्तीला शिंका किंवा खोकला असेल तर जवळच्या व्यक्तीलाही त्याची लागण होऊ शकते. कॉटॅक्ट ट्रान्समिशनमध्ये संक्रमित झालेल्या व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूस विषाणू चिकटून राहतात.
चीन सरकारने लोकांना एकाच ठिकाणी एकत्रित होण्याचे टाळण्यास सांगितले आहे. व्हेंटिलेशनसाठी खिडक्या उघडणे, स्वच्छतेची काळजी, घरात फवारणी व साफसफाई, खासकरुन दाराची हँडल्स, जेवणाची टेबल्स आणि शौचालयाच्या आसने आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ८११ लोकांचा बळी गेला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज