मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील उन्हात खूप काळ फिरणं, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणं, अति व्यायाम करणं, तळलेले, मसालेदार व तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाणं या गोष्टींमुळे उन्हाळ्यातील समस्या वाढतात. या काळात आहाराची म्हणून पथ्ये पाळलीच पाहिजेत. त्यासाठीच्या काही टिप्स
उन्हाळ्यातील आहार- उन्हाळ्यात पचायला हलका व लघु आहार घ्यावा. उन्हाळ्यात वात व पित्तदोषाची वृद्धी होत असते त्यामुळे या काळात वातुळ, पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावं. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सिताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचं सेवन वाढवावं.तसेच थंड तुपाचाही आहारात समावेश करावा.
द्रवाहार असे घ्या
उन्हाळ्याच्या दिवसांत जास्तीत जास्त द्रवाहार करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा. फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिण्यापेक्षा मटक्यातील सौम्य थंड पाणी प्यावं. लोणी, श्रीखंड, मावा, दही, पनीर, लस्सी शक्यतो टाळावं. मद्यसेवन पूर्ण वर्ज्य करावं.
पाणी भरपूर प्या
उन्हाळ्यात शरीरातील मिठाचं व पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे. शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं व भाज्यांचे रस, सरबतं आणि द्रव पदार्थाचं खूप सेवन केलं पाहिजे. मात्र हे घेताना यात साखर सेवन करू नये. साखरेमुळे शरीरातील आम्लधर्मी गुणधर्म वाढून चयापचय क्रियेवर त्याचा परिणाम होतो.
दिवसा थोडी झोप घ्यावी
उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी तसेच सायंकाळी बागेमध्ये गवतावर अनवाणी चालावं. रात्री झोपताना काश्याच्या वाटीने तळपाय चोळावेत. अंघोळीसाठी तसेच वापरासाठी थंड पाणी वापरावे. उन्हाळ्यात शक्य झाल्यास दिवसा थोडी झोप घ्यावी. त्यामुळे शारीरिक-मानसिक समाधान मिळतं.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज