स्वेरीच्या ‘फार्मसी विक’ मध्ये डॉ. कसपटे यांनी दिली सीताफळाविषयी महत्वपूर्ण माहिती
पंढरपूर (संतोष हलकुडे) –
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
‘सर्वात दुर्लक्षित असलेले फळ सीताफळ आहे आणि त्याचाच फायदा मी घेतला. झाडांना फळे किती लागतात यापेक्षा फळ कोणत्या क्वालिटीचे आहे याला खूप महत्व आहे. माझ्या शेतात मी अडीच हजार सीताफळाची झाडे लावली आहेत. ग्राहक हा फळे पहिल्यांदा डोळ्याने खातो त्यानंतर तो तोंडाने खातो. त्यामुळे चांगल्या दर्जाची फळे निर्मांण करणे हे एक आव्हान असते. यासाठी आपण जे कोणते काम करतो त्यात पूर्णपणे जीव ओतून काम केल्यास दुर्लक्षित असणारे देखील अल्पावधीत लक्षवेधी होतात.’ असे प्रतिपादन अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कसपटे यांनी केले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘फार्मसी वीक’चे आयोजन केले असुन त्यात एनएमके-१ गोल्डन या सीताफळाच्या वाणास पिक वाण व संरक्षण हक्क कायदा -२००१ अन्वये देशातील पहीले पेटंट (स्वामित्व हक्क) प्राप्त झालेले डॉ.कसपटे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ‘जीवनात यशस्वी कसे व्हायचे?’ यावर मार्गदर्शन करत होते. प्रा. स्नेहल चाकोरकर यांनी प्रास्तविकात ‘फार्मसी वीक’च्या आयोजनाबाबत माहिती दिली. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. कसपटे म्हणाले की, ‘माझे शिक्षण अकरावी पर्यंत झाले असून १९८५ साली सीताफळावर संशोधन करण्याचे ठरविले. तेथून परिश्रम सुरु केले. आपण लावलेल्या सीताफळाच्या झाडांना पाणी केव्हा द्यायचे? मजूरांना प्रशिक्षण कसे द्यायचे? झाडे कशी लावायची? दोन झाडांमध्ये नेमके किती अंतर असावे ? काढणी कशी करायची? छाटणी कशी करायची ? त्याची निगा कशी राखायची? फळे तयार झाल्यानंतर बाजारपेठेचा शोध कसा घ्यायचा ? यासंबंधी महत्वाची माहिती दिली. आपण सीताफळाचे एकरी बारा लाखाचे उत्पन्न सहज काढू शकतो. शुन्यातून विश्व निर्माती केल्यामुळे आज देशातील व परदेशातील शेतकरी व शास्त्रज्ञांसह अनेक जण माझ्याकडे शेती पाहण्यासाठी येतात.
मेलबर्न (ऑस्ट्रेलीया) येथे झालेल्या सीताफळ परिषदेत महाराष्ट्रातून डॉ. कसपटे यांची निवड झाली त्यावेळी महाराष्ट्रातून वीस शेतकऱ्यांना सोबत घेवून डॉ.कसपटे उपस्थित राहिले तर लंडन मध्ये झालेल्या द्राक्ष मार्केटिंग अभ्यास दौऱ्यासाठी केवळ डॉ. कसपटे यांची निवड झाली होती. सीताफळावर सुरुवातीला संशोधन केले, त्यावर प्रक्रिया केली आणि आज ती फळे बाजारपेठेत आलेली आहेत. त्यातून पाच नवीन प्रकारच्या सीताफळांच्या जाती निर्माण झाल्या असून यासाठी २०१४ साली पेटंटचा प्रस्ताव पाठवला होता. त्याची वरिष्ठांकडून पाहणी व संशोधन करून सिताफळावरील देशातील पहीले पेटंट मिळाले आहे. त्यामुळे माझे सीताफळ देशात सर्वोकृष्ठ ठरले आहे.’ असे सांगून अनेक अनुभव सांगितले. सीताफळाच्या बियांपासून औषध निर्मिती देखील होते. डॉ.कसपटे यांच्या मधुबन (गोरमाळे, ता. बार्शी) या सीताफळाच्या बागेला दक्षिण आफ्रिका, अमेरिका, फ्रांस अशा जवळपास २५ देशातील शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली व परीक्षण केले.
अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. कसपटे त्यांना विविध प्रश्न विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. युवराज अर्जुन, प्रा. प्रज्ञा साळुंखे, प्रा. प्रदीप जाधव, प्रा. व्ही.व्ही. मोरे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. मिथुन मणियार यांनी आभार मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज