टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काल ऐन मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर करणारे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
प्रणिती शिंदे या भाजपची बी टीम म्हणून काम करीत असून त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा कोळी यांनी दिला आहे.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काल सकाळी मतदानानंतर सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेने गडबड केली असून, त्यांनी घाईघाईने सोलापूर दक्षिण मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे.
हा मतदारसंघ पारंपारिक दृष्टीने काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, फक्त एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, त्यावर त्यांनी मतदारसंघावर दावा केला आहे, असे शिंदे यांनी म्हटले होते.
शिंदे यांच्या निर्णयावर शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहेत. त्या भाजपचा प्रचार करतात. त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे. भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे, असे आवाहन कोळी यांनी केले.
लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केलेला नाही.
शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दारांकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही शरद कोळी यांनी केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज