mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दुर्लक्षित असलेल्या कामांना प्राधान्य द्या, लक्षवेधी व्हाल : सीताफळ तज्ञ डॉ.नवनाथ कसपटे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
दुर्लक्षित असलेल्या कामांना प्राधान्य द्या, लक्षवेधी व्हाल : सीताफळ तज्ञ डॉ.नवनाथ कसपटे

स्वेरीच्या ‘फार्मसी विक’ मध्ये डॉ. कसपटे यांनी दिली सीताफळाविषयी महत्वपूर्ण माहिती

पंढरपूर (संतोष हलकुडे) –

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



 ‘सर्वात दुर्लक्षित असलेले फळ सीताफळ आहे आणि त्याचाच फायदा मी घेतला. झाडांना फळे किती लागतात यापेक्षा फळ कोणत्या क्वालिटीचे आहे याला खूप महत्व आहे. माझ्या शेतात मी अडीच हजार सीताफळाची झाडे लावली आहेत. ग्राहक हा फळे पहिल्यांदा डोळ्याने खातो त्यानंतर तो तोंडाने खातो. त्यामुळे चांगल्या दर्जाची फळे निर्मांण करणे हे एक आव्हान असते. यासाठी आपण जे कोणते काम करतो त्यात पूर्णपणे जीव ओतून काम केल्यास दुर्लक्षित असणारे देखील अल्पावधीत लक्षवेधी होतात.’ असे प्रतिपादन अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कसपटे यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

     

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘फार्मसी वीक’चे आयोजन केले असुन त्यात एनएमके-१ गोल्डन या सीताफळाच्या वाणास पिक वाण व संरक्षण हक्क कायदा -२००१ अन्वये देशातील पहीले पेटंट (स्वामित्व हक्क) प्राप्त झालेले डॉ.कसपटे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ‘जीवनात यशस्वी कसे व्हायचे?’ यावर मार्गदर्शन करत होते. प्रा. स्नेहल चाकोरकर यांनी प्रास्तविकात ‘फार्मसी वीक’च्या आयोजनाबाबत माहिती दिली. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. कसपटे म्हणाले की, ‘माझे शिक्षण अकरावी पर्यंत झाले असून १९८५ साली सीताफळावर संशोधन करण्याचे ठरविले.  तेथून परिश्रम सुरु केले. आपण लावलेल्या सीताफळाच्या झाडांना पाणी केव्हा द्यायचे? मजूरांना प्रशिक्षण कसे द्यायचे? झाडे कशी लावायची? दोन झाडांमध्ये नेमके किती अंतर असावे ? काढणी कशी करायची? छाटणी कशी करायची ? त्याची निगा कशी राखायची? फळे तयार झाल्यानंतर बाजारपेठेचा शोध कसा घ्यायचा ? यासंबंधी महत्वाची माहिती दिली. आपण सीताफळाचे एकरी बारा लाखाचे उत्पन्न सहज काढू शकतो. शुन्यातून विश्व निर्माती केल्यामुळे आज देशातील व परदेशातील शेतकरी व शास्त्रज्ञांसह अनेक जण माझ्याकडे शेती पाहण्यासाठी येतात.

मेलबर्न (ऑस्ट्रेलीया) येथे झालेल्या सीताफळ परिषदेत महाराष्ट्रातून डॉ. कसपटे यांची निवड झाली त्यावेळी महाराष्ट्रातून वीस शेतकऱ्यांना सोबत घेवून डॉ.कसपटे उपस्थित राहिले तर लंडन मध्ये झालेल्या द्राक्ष मार्केटिंग अभ्यास दौऱ्यासाठी केवळ डॉ. कसपटे यांची निवड झाली होती. सीताफळावर सुरुवातीला संशोधन केले, त्यावर प्रक्रिया केली आणि आज ती फळे बाजारपेठेत आलेली आहेत. त्यातून पाच नवीन प्रकारच्या सीताफळांच्या जाती निर्माण झाल्या असून यासाठी २०१४ साली पेटंटचा प्रस्ताव पाठवला होता. त्याची वरिष्ठांकडून पाहणी व संशोधन करून सिताफळावरील देशातील पहीले पेटंट मिळाले आहे. त्यामुळे माझे सीताफळ देशात सर्वोकृष्ठ ठरले आहे.’ असे सांगून अनेक अनुभव सांगितले. सीताफळाच्या बियांपासून औषध निर्मिती देखील होते. डॉ.कसपटे यांच्या मधुबन (गोरमाळे, ता. बार्शी) या सीताफळाच्या बागेला दक्षिण आफ्रिका, अमेरिका, फ्रांस अशा जवळपास २५ देशातील शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली व परीक्षण केले.

अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. कसपटे त्यांना विविध प्रश्न विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. युवराज अर्जुन, प्रा. प्रज्ञा साळुंखे, प्रा. प्रदीप जाधव, प्रा. व्ही.व्ही. मोरे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. मिथुन मणियार यांनी आभार मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दोन शिक्षकांनी केला सहावीत शिकणाऱ्या मुलीचा बलात्कार; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन शिक्षकांनी केला सहावीत शिकणाऱ्या मुलीचा बलात्कार; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा