मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे त्याचे वडील मधुकर शिवशरण यांनी रविवारी नोंदवली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मधुकर शिवशरण हे माचणूर येथे राहतात त्यांना दोन मुले आहेत प्रतीक हा तिसरी मध्ये शिकणारा मुलगा आहे.तो गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. शनिवारी तो सकाळी शाळा असल्याने शाळा संपल्यानंतर घरी आला नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास बाहेर खेळण्यासाठी गेला तो घरी आला नाही अशी माहिती पत्नी प्रिया यांनी फोन वरून आपले पती मधुकर शिवशरण याना दिली.
फिर्यादी शिवशरण रात्री पावणे आठ च्या सुमारास घरी आले यावेळी त्यांची पत्नी हिने जिल्हा परिषद शाळेसमोर सहा वाजता खेळत होता अशी माहिती सांगितली त्यानंतर फिर्यादीने गावात जाऊन शोध घेतला त्याच्या सोबत खेळणाऱ्या मुलांकडे चौकशी केली असता शाळेच्या पटांगणात सहा वाजेपर्यंत खेळत असलेला दिसला होता असे सांगण्यात आले यानंतर फिर्यादीने मिलिंद शिवशरण अशोक शिवशरण सिद्धेश्वर कुचेकर बाळकृष्ण कलुबर्मे पत्नी प्रिया सासू शोभा यांच्यासमवेत रात्रभर शोध घेतला सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली.
मात्र सापडला नाही म्हणून त्यांनी रविवारी प्रतीक यास अज्ञात इसमाने पळवून नेले आहे म्हणून फिर्याद दाखल केली. याविरुद्ध याबाबत अज्ञात इसमा विरोधात भादवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार एम बी जमादार हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज