मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याच्या कारणावरून संतोष ज्ञानेश्वर शिंदे( वय 38 रा.सरकोली) याचे मंगळवेढा बसस्थानकावरून अपहरण करून त्याला जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कर्नाटकातील कल्लूकनीयाली येथील दगडाच्या खाणीत फेकून दिल्याप्रकरणी तानाजी बळीराम भोसले,दादा उर्फ ऋषिकेश नवनाथ गायकवाड रा.अंाबे,तानाजी दांडगे,रा.रांझणी,सागर महादेव दांडगे रा.चळे व मयताची पत्नी अनिता संतोष शिंदे रा.सरकोली या पाच जणांविरूध्द अपहरण करून खून करणे व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी की,यातील मयत संतोष ज्ञानेश्वर शिंदे हा मुळचा सरकोली येथील असून तो दि.29 जुलै रोजी हिवरगाव ता. मंगळवेढा येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आला होता. अंत्यविधी उरकल्यानंतर दुपारी त्याचे नातेवाईक संजय नागणे यांनी त्याला मोटरसायकलवरून मंगळवेढा बसस्थानकावर सोडले होते. तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. म्हणून छगन नागणे याने पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांनी बसस्थानकावरील सी.सी. फुटेज तपासले असता संतोष यास चार इसम चालत घेवून जात असल्याचे दिसून आले. यामधील दोन इसमांची ओळख पटली यामध्ये आंबे गावातील तानाजी भोसले व दादा उर्फ ऋषिकेश गायकवाड हे असल्याचे मयताच्या नातेवाईकांनी ओळखले.तानाजी भोसले याचे मयत संतोष शिंदे यांची पत्नी अनिता हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
वरील दोघांचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासल्यानंतर हे बेपत्ता असल्याचे लोकेशनवरून निष्पन्न झाले.सदर प्राप्त नंबरवरून वेळोवेळी ते संपर्कात आल्याचेही उघड झाले. मयत संतोष शिंदे यास मंगळवेढा येथील बसस्थानकावरून चार चाकी वाहनातून त्याचे अपहरण करून जीवे ठार मारून त्याचे प्रेत विजापूर येथील दगडाचे खाणीमध्ये टाकून दिले होते. विजापूर पोलिसांनी हा मृतदेह अज्ञात म्हणून फ्रिजमध्ये राखून ठेवले होते. सदर मयताचे फोटो नातेवाईकांनी पाहिले असता तोच संतोष शिंदे असल्याची खात्री पटली.दरम्यान पोलिसांनी मयताची पत्नी हिस अधिक तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
———–

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज