मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने सोलापूर-विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़ यात खिलार गायी-बैलांसह मुरा, खोंड, गीर गाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील १० ते २० एकरात जनावरांचा बाजार भरविण्यात आलेला आहे़ मागील वर्षीपेक्षा यंदाच्या जनावरांच्या बाजारास नागरिक, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदाचा जनावरांचा बाजार हाऊसफुल्ल झाला आहे. या बाजारात १० हजारांपासून अडीच ते चार लाखांपर्यंतची जनावरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ मागील वर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे.
या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे़ यामुळे दूध देणाऱ्या म्हशी, गायी यांच्या विक्रीचे प्रमाण कमी आहे़ मात्र ज्या गायी, म्हशी बाजारात दाखल झालेल्या आहेत त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत़ शिवाय खरेदीचे प्रमाणही अधिक आहे. म्हशीची १५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत विक्री होत आहे़ यात जाफराबादी, मुर्रा जातीच्या म्हशीची किंमत ५० हजार ते सव्वा लाखापर्यंत आहे़ यंदा बाजारात मंदिर समितीच्यावतीने पाण्यासह शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सेवासुविधा पुरविण्यात आल्याची माहिती चिदानंद वनारोटे यांनी दिली़
कर्नाटक, मराठवाड्यातील जनावरे बाजारात…
– हा बाजार रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर ते मोदी रेल्वे बोगद्यापर्यंत भरलेला आहे
. कर्नाटक, मराठवाडा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच विविध भागातील शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस आणली आहेत. यंदाच्या जनावरांच्या बाजारात विविध प्रकारचे बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय, म्हशीमध्ये-पंढरपुरी म्हशी, गेरू म्हैस, जाफराबादी म्हैस, मुर्रा जातीच्या म्हैशी विक्रीसाठी आहेत़ गीर गाय ही साधारणत: १२ लिटर दूध देते़ या म्हशीची अंदाजे किंमत १० हजारांपासून सव्वा लाखांपर्यंत आहे़ जाफराबादी म्हशीसह गीर गायीला, म्हशीला बाजारात मोठी मागणी आहे तसेच विविध प्रकारची जनावरे विक्रीस आली आहेत़

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज