mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

स्वेरीत मिनी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न;पंढरपूर तहसील कार्यालयाचा उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर- स्वेरी आणि पंढरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकशाही मतदार दिन (२५ जानेवारी) निमित्त स्वेरीच्या भव्य मैदानावर  नवमतदारांमध्ये मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळावी, जनजागृती व्हावी या  हेतूने विशेष करून विद्यार्थीनींसाठी स्वेरीमध्ये ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वेरीसह पंढरपूर शहरातील विद्यार्थीनींनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814



        पंढरपूरच्या तहसीलदार आणि सार्वत्रिक निवडणूकीच्या (पंढरपूर विभाग) सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी डॉ. वैशाली वाघमारे व स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने स्वेरीज् अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रंगनाथ हरीदास व प्रा.महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीच्या मैदानातून सुरू झालेले हे मिनी मॅरेथॉन सरकोली रोडवरील चळे फाटा पर्यंत जाऊन परत आले.

साधारण दोन किमी अंतराच्या ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये उमा महाविद्यालयाच्या मोनाली जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर स्वेरीच्या रोहिणी चव्हाण यांनी द्वितीय तर स्वेरीच्याच अमृता रणदिवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून आरती देवमारे प्रथम आणि राधिका पुणेकर यांना द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. मॅरेथॉनमधील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. याच निमित्ताने तहसील कार्यालय पंढरपूरमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यात देखील मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक रोहिणी पाटील, द्वितीय क्रमांक अनिता जाधव तर तृतीय क्रमांक प्रार्थना पाटील यांनी पटकाविला. यावेळी तहसील कार्यालयाच्या वृषाली अधटराव, ज्येष्ठ लिपिक राहुल शिंदे, तांत्रिक सहाय्यक उमेश भोसले यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

मतदान करण्यासाठीच्या जनजागृतीबाबत मार्गदर्शन करताना तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे म्हणाल्या की, ‘सशक्त लोकशाहीसाठी मतदार साक्षरता’ अशी यंदाच्या मतदान दिनाची संकल्पना असून लोकशाही बळकट करायची असेल तर आपल्यासारख्या अठरा वर्षाच्या वयोगटातील युवक-युवतींनी या सार्वत्रिक मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपले बहुमोल मत दिले पाहिजे. मिनी मॅरेथॉनमध्ये आपल्यासारख्यांच्या सहभागामुळे मतदानाची जनजागृती वाढते म्हणून या सांघिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ज्यांची वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत त्या मुलामुलींना मतदान करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम स्वेरीत प्रथम राबविण्यात आला.’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत उमा महाविद्यालय, के.बी.पी. महाविद्यालय, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांतील विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा.करण पाटील, प्रा. के. एस. पुकाळे, प्रा. पी. डी.तरळगट्टी, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

 प्रा. यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

छायाचित्र- स्वेरी व पंढरपूर तहसील कार्यालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय लोकशाही मतदार दिन’ निम्मित्त स्वेरीच्या मैदानांवर ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी उदघाटन करताना तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे सोबत स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रंगनाथ हरीदास व प्रा.महेश मठपतीव इतर प्रध्यक वर्ग व विद्यार्थीनी.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: SamajikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये पारंपरिक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा