मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा येथील यशवंत पटांगणावर इयत्ता अकरावी कला वाणिज्य शास्त्र व्यवसाय शिक्षण विभाग या विभागातील विद्यार्थ्यांनी विविध पेहराव व वेशभूषा करत परंपरिक दिन साजरा केला. इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मंगळवेढा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव चव्हाण होते तर उपप्राचार्य तेजस्विनी कदम सह कला वाणिज्य शास्त्र व्यवसाय शिक्षण विभागातील विभाग प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य तेजस्विनी कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देशाच्या विविध पेहरावाची माहिती व्हावी वेशभूषा व त्याचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना ज्ञानात भर घालणारे असावे या हेतूने परंपरिक दिन जुनिअर कॉलेजमध्ये सुरू केली असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य शिवाजीराव चव्हाण यांनी सारे भारतीय बांधव असून विविधतेने नटलेल्या या देशांमध्ये विविधतेत एकता असून सर्व जाती धर्म हे एका विचाराने देशात वागत आहेत त्यामुळे लोकशाही बळकट आहे भविष्यात आजचे विद्यार्थी उद्याच्या देशाचे नागरिक असणार आहेत त्यांना सर्वधर्मसमभाव व प्रत्येक जाती विषयी समन्यायी भूमिका घेता यावे यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम उपयुक्त ठरतात असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकामध्ये प्रा संगीता ताड यांनी देशात अनेक संस्कृती बोलीभाषा व चालीरीती असलेला हा एकमेव देश असून इतकी विविधता असून देखील या देशाची एकता अखंडित आहे देशाची रचना भौगोलिक प्रदेश वार झाले असल्याने प्रत्येक ठिकाणची वेगळे वैशिष्ट्य पाहायला मिळते असा हा भारत देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे पेहराव वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये अकरावी शास्त्र मधील अकांक्षा बळवंतराव हिने पारंपारिक कोळी बांधवांच्या वेशभूषेचे पेहराव परिधान करून याचे महत्त्व अधोरेखित केले तर अकरावी शास्त्र मधील जाधव हिने पेशवाई काळातील रियाजा वेशभूषा व पेहराव परिधान करायचा या प्रकारचा वेशभूषा व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले तर वाणिज्य मधील बोराडे या मुलीने त्यांच्या ग्रुपच्यावतीने शिवकन्या या प्रकारचा पेहराव करण्याचे वैशिष्ट्य सांगितले शास्त्र मधील अनेक मुलांनी पारंपरिक धनगरी पोशाख शेतकरी वारकरी अशा पेहरावात पारंपरिक दिनाला उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भारत शेटे यांनी केले. आभार प्रा सचिन इंगळे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज