मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून पोलिस कॉन्स्टेबलने पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून स्वतः गळ्यावर वार करून घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार (दि.14) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खानापूरात घडली. कृष्णा धोंडिबा माने (वय ३०) व कमल जाधव (वय २५ दोघे रा.खानापूर नगर, परभणी) अशी मरण पावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
कमल जाधव ह्या येथील नानलपेठ पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. या वादातूनच ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरुन खून केल्यानंतर कृष्णा माने याने स्वतःवरही वार करून घेतले.ते दोघेही जागीच मरण पावले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, नवामोंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर तट यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. घरातील एका खोलीत कमल जाधव रक्तबंबाळ अवस्थेत तर खोलीच्या बाहेरील व्हरांड्यात कृष्णा माने हे मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. मयत कृष्णा माने याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, भावजयी व दीड वर्षाचा मुलगा आहे. कृष्णा माने व कमल जाधव यांचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज