mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

माझी उमेदवारी ही कोणत्या पक्षाची नाही तर माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे मी मतदारसंघाचा विकास करायचा हे ध्येय घेऊन जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवित आहे ज्या जनतेने मला निवडणूक लढविण्याचे बळ दिले आहे ती जनता मला निवडूनही आणणार आहे तरी सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते ढवळस, धर्मगांव, मुढवी, उचेठाण, बठाण, अरळी, बोराळे येथे आयोजीत केलेल्या प्रचार सभांमध्ये बोलत होते.

पुढे बोलताना आवताडे म्हणाले की , आजपर्यंत या मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे. परंतु हे वास्तव आहे. आजपर्यंत विकास हा शब्द प्रत्येक वेळी कानाने आपण ऐकत आलो आहोत परंतु विकास खरोखर काय असतो हे मला जनतेला दाखवून द्यायचे आहे. नदीकाठावरची गावे असूनही या गावांच्या अडचणी आहेत. उजनी धरण स्थापण होवून इतकी वर्षे झाली. आपल्या हक्काचे पाणी कोठे गेले, कसे गेले, ही जबाबदारी कोणाची होती याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली नदीकाठाला पाण्याची पाळी वाढत होती. 

परंतु उजनी ते सोलापूर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. रस्ते प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अनेक प्रश्नांनी या मतदारसंघातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. समस्यांचा पाढा वाढतच आहे. हे सर्व बदलण्यासाठी एक वेळ संधी द्या. विकास कामे करण्यात मी कमी पडलो तर पुढच्या निवडणूकीमध्ये मी तुमच्याकडे मत मागायला येणार नाही असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.

सदर प्रसंगी दत्तात्रय जमदाडे सर म्हणाले, कोणत्या उमेदवाराच्या वयाबध्दल मी टिका टिपण्णी करणार नाही , कारण प्रत्येकाला या वार्धक्यातून जावेच लागणार आहे. परंतु या अशा वयामध्ये असे उमेदवार जनतेची कामे कशी करणार आहेत हा मतदारांनाच पडलेला प्रश्न आहे. सिमेवर रक्त सांडणा-या जवानांच्या पत्नीबध्दल अवमानकारक भाष्य करणा-यांना म्हणजेच त्यांच्या कुठुंबातील सदस्याला उमेदवारी मिळतेच कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. जवानांच्या सांडलेल्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला अशा उमेदवाराला राजकारणातूनच तुम्ही उध्वस्त करा असे प्रतिपादन केले.

या प्रचार सभांमध्ये शिवसेनेचे नेते प्रा.येताळा भगत सर, प्रा.समाधान क्षिरसागर,शेतकरी संघटणेचे सिध्देश्वर हेंबाडे,मारुती गायकवाड, भागवत बेदरे, बाळासो घोडके,बाबासो बावचे,सुभाष चौगुले तसेच इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी दामाजी कारखान्याच्या संचालिका स्मिता म्हमाणे,चंद्रकांत गरंडे, औदुंबर मोरे, शिवाजी हेंबाडे,दत्तात्रय हेंबाडे,पंपू मोरे,आण्णासाहेब टकले, पांडूरंग माने,गंगाराम माने,अनिल माने,सुरेश टकले,अविनाश कुचेकर,बिभीषण बेदरे,सुभाषभाऊ बेदरे,विकास बेदरे, दादासो बेदरे, संजय बेदरे, राजाभाऊ बाबर,रावसाहेब राजमाने, रविंद्र कुंभार, शिवाजी मोहिते, पैगंबर  इनामदार, कासाय्या स्वामी, शिवाजी सरसंबी, सुभाष मोहिते, गणेश गांवकरे, भिमाशंकर कवचाळे, कामण्णा बनसोडे, तानाजी जाधव, अशोक पाटील, तानाजी जाधव, बसाण्णा पाटील, चनवीर लंगोटे, डॉ.रत्नाकर बनसोडे, राजकुमार स्वामी, अक्षय पवार आदिसह संबंधीत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन,सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सदर ठिकाणी सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार येताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार : अजित पवार

राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार येताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा