मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना रेशन दुकानांवर साहित्य न मिळणे , बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत तत्काळ निरसन केले जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरूपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरिकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खाते सदैव तत्पर आहे . तक्रारदारांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे . संतोषसिंग परदेशी – खासगी सचिव – ९८७०३३६५६० अनिल सोनवणे – विशेष कार्य .अधिकारी – ९७६६१५८१११ महेंद्र पवार – विशेष कार्यकारी अधिकारी – ७५८८०५२००३ महेश पैठणकर – स्वीय सहायक – ७८७५२८०९६५
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज