मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । एक एप्रिलला अनेक जण आपल्या परिचितांना एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करीत असतात.यंदा जगावर कोरोना विषाणचे संकट आले आहे.अशा परिस्थितीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज एप्रिल फूल म्हणून टाकू नये,नाहीतर गुन्हे दाखल करण्यात येतील,असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फूल बनविण्याची पद्धत आहे.त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे,असा त्यामागे हेतू नसतो.मात्र,यंदा परिस्थिती वेगळी आहे.लॉकडाउनमुळे देशातील सर्व लोक घरात बसून आहेत.कोरोना विषाणूचे संकट, संचारबंदी या संदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतील,अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करु नये.अशा मेसेजमुळे संभ्रमावस्था निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही, प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही,याकडे लक्ष द्यावे.
सोशल मिडियावर अशा स्वरुपाचे मेसेज व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्यास व त्या ग्रुप अॅडमिनला कलम ६८ नुसार पोलीस प्रतिबंध करीत आहेत.असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४०, तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जातील,असे पोलिसांनी कळविले आहे.
ग्रुप अॅडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सूचना द्याव्यात तसेच सेटींगमध्ये जाऊन ग्रुप अॅडमिन मेसेज सेंड करील असे सेंटिग करावे अशी सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज