मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचा भंग करून चार चाकी व टु व्हिलरवरून फिरणारे तसेच विनाकारण पायी चालत फिरल्या प्रकरणी 22 लोकांवर मंगळवेढा पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या घटनेत यातील आरोपी संजय सलवदे (रा डोणज),योगेश जाधव,अभिषेक पाटील,अमर गवळी (रा.बोराळे),सचिन कपले(रा.सिध्दापूर) आदी आरोपी दि. 30 रोजी 7.30 वा. बोराळे येथील बसवेश्वर मंदिराच्या कट्टयावर विनाकारण एकत्रीत जमून स्वतःचे व इतरांचे जीवितास संसर्ग पसरेल अशा स्थितीत मिळून आले याची फिर्याद पोलिस हवालदार चन्नप्पा म्हेत्रे यांनी दिल्यानंतर वरील पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत दि. 30 रोजी 5.30 वा. मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मार्केट यार्डासमोर रस्त्यावर आरोपी शरीफ कलाल,अब्दुल वस्ताद रा.मंगळवेढा हे दोघे स्वतःचे तोंडास मास्क न लावता व स्वतःचे व इतरांच्या जिवीतास धोका उत्पन्न होईल अशा स्थितीत मोटर सायकलवर विनाकारण फिरत असताना मिळून आल्याची फिर्याद पोलिस नाईक विकास क्षीरसागर यांनी दिली आहे.
तिसर्या घटनेत आरोपी विठ्ठल गारगोंडे,दामाजी माळी,सुहास मेटकरी,मारुती कवडे(रा.मंगळवेढा) आदी दि.30 रोजी शहरात मुंबई पोलिस अधिनियम 144 प्रमाणे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असताना वरील चार आरोपींनी एकत्र जमून संसर्ग पसरेल अशा स्थितीत मिळून आल्याची फिर्याद पोलिस शिपाई अनिल दाते यांनी दिली आहे.
चौथ्या घटनेत आरोपी संंग्राम गायकवाड (रा.ढवळस) याने एम एच 13 के एच 6189 या मोटर सायकलवरून स्वतःचे व इतरांचे जीवीतास संसर्ग पसरेल अशा स्थितीत चोखामेळा चौकात मिळून आला असल्याची फिर्याद पोलिसांनी दिली आहे.
पाचव्या घटनेत आरोपी दामोदर ढेकळे,चंद्रकांत ढेकळे (रा.देगांव) हे दोघे एम एच 13 डी.एफ 9193 वरून स्वतःचे तोंडास मास्क न लावता मोटर सायकलवर फिरत असताना पंढरपूर रस्त्यावरील महादेव मंदिरासमोर मिळून आला असल्याची फिर्याद पोलिस नाईक समाधान पाटील यांनी दिली.
सहाव्या घटनेत आरोपी अनिकेत गायकवाड , प्रथमेश बोडके (रा.मंगळवेढा) हे दोघे एम एच 13 सी.बी. 0985 वरून तोंडास मास्क न लावता मोटर सायकलवर दामाजी चौकात मिळून आले.
सातव्या घटनेत नंदू चव्हाण,दिनानाथ चव्हाण(रा.मंगळवेढा) हे एम एच 13 सी एच 6281 वरून तोंडास मास्क न लावता फिरत असताना मार्केट यार्डासमोर मिळून आल्याची फिर्याद पोलिस शिपाई अजित मिसाळ यांनी दिली आहे.
आठव्या घटनेत आरोपी सुखसेन हुवहा (रा.मध्य प्रदेश),अमर धनगर (रा.उत्तर प्रदेश) हे दोघे एम एच 13 सी ए 6821 या मोटर सायकलवरून तोंडास मास्क न लावता संजीवनी हॉस्पीटलजवळून जाताना मिळून आल्याची फिर्याद पोलिस शिपाई नागनाथ डबरे यांनी दिली.
नवव्या घटनेत आरोपी रमेश चव्हाण (रा.विजापूर),अर्जून जाधव(रा.इंडी) हे दोघे के ए 28 एक्स,4504 वरून मास्क न लावता मिळून आल्याची फिर्याद पोलिसांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज