मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी रेल्वेकडून प्रवासी गाड्यांच्या ५ हजार डब्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे . यापैकी अडीच हजार रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करण्यात आल्याची माहिती सोमवारी रेल्वे विभागाने दिली.
या विलगीकरण कक्षांमध्ये ४० हजार खाटा वापरासाठी तयार आहेत . प्रोटोटाइपची मंजुरी मिळाल्याबरोबर रेल्वेद्वारे झोनल वॉर्डने रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्ष म्हणून तयार करायला सुरुवात केली . भारतीय रेल्वे विभाग प्रत्येक दिवसाला जवळपास ३७५ रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करत आहे . देशात १३३ ठिकाणी हे कार्य सुरू आहे.
या रेल्वे डब्यांत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . आणीबाणीच्या काळात गरज पडल्यास आरोग्य मंत्रालय या विलगीकरण कक्षांचा वापर करणार असल्याचे रेल्वे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज