मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी मरवडे येथे पकडून वाळूसह ५ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून वाळू चोरी व पर्यावरणाचा हास केल्याप्रकरणी सतीश पांडुरंग डोके व दिगंबर तानाजी जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी संतोष डोके हा ट्रकमालक दिगंबर जाधव यांच्या एमएच १३ आर ०१५० मधून १२ हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू चोरून भरून विनापरवाना गुरुवारी येड्राव ते मरवडे रोडवरील लतीफ तांबोळी यांच्या मंगल कार्यालयाजवळ वाहतूक करीत असताना मिळून आल्याची फिर्याद पोलीस शिपाई अनिल दाते यांनी दिल्यावर वरील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सुनील गायकवाड हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज