mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील शिक्षकास विदयार्थीनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यातील शिक्षकास विदयार्थीनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थीनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी त्यांचा शिक्षक असलेला विलास काशिनाथ मसरे यास पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश श्रीमती के.व्ही. बोरा यांनी दोषी धरून भा.दं .वि कलम ३७६ (२) (आय) ३७६ ( २ ) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ , ५ , ६ , ९ , १० प्रत्येकी १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व रुपये १० हजार अशी एकूण ३० वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. 

याप्रकरणी हकिकत अशी की ,यातील आरोपी विलास काशिनाथ मसरे हा लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या चौथीच्या वर्गाला शिक्षक म्हणून होता. यातील तीनही पिडीत मुली सदर वर्गात शिकत असताना ऑगस्ट २०१५ ते फेब्रुवारी २०१६ च्या दरम्यान वेळोवेळी पिडीत मुलींना शाळेतील संगणक कक्षात शिकवण्याचा व संगणकावरील खेळ शिकवण्याचा बहाणा करून पिडीत मुलींना एक एक करून संगणक कक्षात बोलावून त्यांचेशी अश्लील लैंगिक चाळे करून त्यांनी सदर प्रकार कोणास सांगू नये म्हणून धमकी दिली वगैरे मजकुराची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने मंगळवेढा पोलिस स्टेशनला दाखल केली होती. 

त्याप्रमाणे आरोपीविरूध्द मंगळवेढा पोलिस स्टेशनला गु . र . नं . २६६ / २०१६ भा . दं . वि . कलम ३७६ ( २ ) ( आय ) ३७६ ( २ ) ( एन ) ( एफ ) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ , ५ , ६ , ९ , १० प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदर प्रकरणी पोलिस निरिक्षक हारूण शेख व पोलिस निरिक्षक रविंद्र शेळके यांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते . 

त्यानुसार पंढरपूर सत्र न्यायालयात विशेष खटला ४२ / २०१६प्रमाणे कामकाज चालले . सदर आरोपीविरूध्द दाखल झालेल्या गुन्हयाचे सिध्दतेकरीता सरकार पक्षाकडून १५ साक्षीदार तपासण्यात आले तर आरोपीपक्षाकडून ३ बचाव साक्षीदार तपासण्यात आले . 

सरकारपक्षाकडून नोंदविण्यात आलेल्या साक्षीमध्ये तीनही पिडीत मुली तसेच त्यांचे पालक पिडीत मुलींना बोलावणारा विदयार्थी तसेच तसेच पंच साक्षीदार व वैद्यकीय अधिकारी शाळेतील शिक्षिका फिर्याद नोंदविणाऱ्या महिला पोलिस उपनिरिक्षक अमृता पटनाईक व तपासिक अधिकारी हारूण शेख यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या . व आरोपीने केलेला गुन्हा या सर्व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये सुसंगत पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या व पिडीत मुलींनी व त्यांचे पालकांनी आरोपीस एवढया मोठया खोटया केसमध्ये गुंतवणेबाबतचे वैमनस्य नाही व या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचे न्यायनिवाडे सादर करून आरोपीने केलेला गुन्हा सरकार पक्षातर्फे शाबीत करण्यात आला .

यामध्ये आरोपीस गावातील राजकारणाचे कारणावरून खोटया गुन्हयात गुंतविण्यात आलेले आहे व पिडीत मुलींना दुसऱ्या शाळेत शिकण्याचे होते व त्यास आरोपी विरोध करीत होता . असा बचाव घेण्यात आला परंतू सरकारपक्षाकडून आरोपीविरूध्द दाखल असलेला गुन्हा संशयाच्या पलिकडे शाबीत करण्यात आलेला आहे असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले . 

त्याप्रमाणे झालेला साक्षीदारांचा पुरावा व तपास कामातील कागदपत्रांचे अवलोकन करून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के . व्ही . बोरा यांनी आरोपीस भादंवि कलम ३७६ ( २ ) ( आय ) करीता १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड तसेच ३७६ ( २ ) ( एन ) ( एफ ) १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६ करीता १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली . आरोपीस झालेल्या शिक्षा हया एकत्रित भोगावयाच्या आहेत . 

यात सरकारपक्षाकडून सरकारी वकिल सारंग वांगीकर , दत्ता पवार , एस . एस . दुलंगे यांनी कामकाज चालविले . तर कोर्ट पैरवी म्हणून अमर नवले , रमेश सूर्यवंशी हे कार्यरत होते . तर सदर केसच्याकामी तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलिस निरिक्षक हारूण शेख व रविंद्र शेळके यांना चौकशी करण्यापासून ते दोषारोपपत्र सादर करेपर्यंत हवालदार दत्त्तात्रय तोंडले यांनी महत्वाची भूमिका बजावली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार : समाधान आवताडे

महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार : समाधान आवताडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा