मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने पार्क स्टेडियमच्या सुशोभीकरणाच्या कामाची वर्कआॅर्डर दिली आहे. या कामासाठी पुढील आठवड्यापासून पार्क स्टेडियम बंद राहणार आहे. नऊ महिन्यात काम पूर्ण होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने पार्क स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठी २० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. स्टेडियमवर लवकरात लवकर आयपीएल, रणजी क्रिकेट सामने व्हावेत यासाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामांची निविदा काढण्यात आली होती. पुण्याच्या कृष्णाई कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले. स्मार्ट सिटी कंपनीने वर्कआॅर्डर दिली आहे. पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुशोभीकरणाच्या कामासाठी पार्क स्टेडियम बंद ठेवावे लागणार आहे. सध्या सकाळी आणि सायंकाळी याठिकाणी खेळाडूंचा सराव सुरू असतो. महापालिकेचे क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी पार्क स्टेडियमच्या तात्पुरत्या हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्यापुढे ठेवण्यात आला. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पार्क स्टेडियम स्मार्ट सिटी कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज