मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेल्या काही दिवसांपासून हुरडा पार्टी करण्याचा जोर जिल्ह्याभरात वाढला आहे. शेतकर्यांनी शेतात शहरी भागातील पाहुण्यांसाठी आयोजित करणारी हुरडा पार्टी काळानुसार मागे पडत असून व्यावसायिक हुरडा पार्टीत सहभागी होण्यात शहरवासीयांचा प्रमाण वाढले आहे. सोलापूर शहरालगत काही ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या हुरडा पार्टीसाठी प्रति व्यक्तीस पाचशे रुपयांचा दर आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी ग्रामीण भागात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत हुरडा पार्टीचा जोर असतो. यानिमित्ताने शहरी, ग्रामीणमधील मित्रमंडळी, पाहुण्यांत जणू वार्षिक स्नेहमेळावाच भरतो.
यंदा जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी ज्वारी चांगली आहे. नदीकाठच्या व पाण्याच्या ठिकाणी सध्या हुरडा पार्टी रंगतदार ठरत आहे. कोरडवाहू शेतातील हुरडा अजूनही झाला नसल्याने पुढील काही दिवसांत कोरडवाहू असणार्या शेतकर्यांच्या शेतातही हुरडा पार्टी रंगणार आहेत.
शहरी भागातील नागरिकांची हुरडा पार्टीची रुची पाहून अनेक व्यावसायिक संस्थांनी शहरातलगतच खास हुरडा पार्टी स:शुल्क आयोजित करणे सुरू केले आहे. पाचशे ते सातशे रुपये एका व्यक्तीकडून यासाठी शुल्क आकारून त्यांना यात हुरडा व एकवेळचे खमंग जेवण देण्याचा प्रयत्न या व्यावसायिक संस्थेकडून होत आहे. दिवसाचे काम संपल्यानंतर सायंकाळी याठिकाणी शहरवासीयांची चांगलीच गर्दी होत असताना दिसून येत आहे. मात्र, शेतकर्यांनी प्रेमाने भाजून दिलेला हुरडा व अस्सल गावरान मेजवानीची चव व्यावसायिक हुरडा पार्ट्यांना येऊ शकत नाही, अशीच प्रतिक्रिया व्यावसायिक हुरडा पार्टीत सहभागी झालेल्या नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर शहरातील सोरेगाव, कोंडी, तुळजापूर नाका, पाकणी यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक हुरडा पार्ट्यांना जोर वाढला असून यात सहभागी होणार्या हायटेक शहरवासीयांचीही संख्या दिसून येत आहे.
सोलापुरात सध्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भरलेल्या गड्डा यात्रेतही काही ठिकाणी गरमागरम हुरड्याचे स्टॉल मांडण्यात आले असून याठिकाणीही शंभर रुपये ते दीडशे रुपये किलो याप्रमाणे भाजलेला हुरडा विकला जात असल्याचे दिसून येत आहे. होम मैदानावर तयार हुरड्याचीही विक्री जोमात दिसून येतआहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज