मंगळवेढा/समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी-निंबोणी रोडवर पाठीमागून येणाऱ्या टिपरने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील अर्चना बसवंत पाटील(वय.५५) व पूजा शैलेश पाटील (वय.३०) (रा. भाळवणी ता. मंगळवेढा) या सासू सुनाचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये शैलेश बसवंत पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना इंदिरा नगर येथे सायंकाळी ६ च्या सुमारास घडली आहे.
#साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निंबोणी येथून आठवडी बाजार घेऊन घराकडे कडे निघालेल्या प्लॅटिना गाडी क्र. एम.एच.१३.सी.झेड ८८१८ या गाडीस टिपर क्र. एम.एच.१०.२३९० यांने पाठीमागून येऊन जोराची धडक दिल्याने यामध्ये अर्चना पाटील व पुजा पाटील या जागीच मृत्यू झाल्या आहेत.तर मयत पुजा पाटील चे पती शैलेश पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची ४ वर्षाची मुलगी स्वराली शैलेश पाटील हिच्या हाताला लागले असून टिपर चालकाने धडक देऊन पळून गेला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
#साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी,पोलीस कॉन्स्टेबल दाते, सलगर व धानगोंडा हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज