मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आलेल्या असताना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश धस हे बीड जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या मदतीसाठी भिगवण (जि.पुणे) येथे गेले होते. यावरुन आमदार धस यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. एखाद्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यात पहिलीच घटना आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, भिगवण येथे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश धस हे जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या मदतीसाठी गेले होते. संचारबंदीच्या काळात जिल्हा बंदीचे आदेश आहेत. त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी संचार बंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात कलम 188, 269, 270, 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज