मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा बिलापोटी जून अखेर एकूण ६ कोटी ५० लाख ७० हजार ६०० रुपये बिल छावणीचालकाना येत्या दोन दिवसात मिळणार आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
निम्मा पावसाळा संपत आला तरीही मंगळवेढा तालुक्यात अजून सर्वदूर दमदार पाऊस पडला नसून जनावरे जगविणे मुश्किल झाले आहे . आशा परिस्थितीत शासनाने छावण्या सुरू करून मुक्या जनावरांना चाऱ्याची सोय केली आहे . यामध्ये तालुक्यात सुरुवातीला ६१ छावण्या सुरू होऊन त्यामध्ये ३७ हजार ९१८ जनावरे दाखल झाली होती मात्र गेल्या पंधरवाड्यात वारंवार पडलेल्या रिमझिम पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे घरी नेल्याने नऊ छावण्या बंद झाल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यात एकूण मोठी ७२ हजार ६६० व लहान २४ हजार ९३५ अशी ९७ हजार ५९५ जनावरे आहेत . नदीकाठचा भाग वगळता तालुक्यात चाऱ्याची पेंडीही शिल्लक नाही , त्यामुळे दुभत्या जनावरांनाही छावणीत मिळणाऱ्या ऊसावर गुजराण करावी लागत आहे.
२० एप्रिल पासून तालुक्यात चारा छावण्या सुरू केल्या असून या ६१ छावण्यांमध्ये लहान ४ हजार ८१० व मोठी ३३ हजार ९०८ अशी मिळून ३७ हजार ९१८ जनावरे दाखल होती पण सिद्धनकेरी , येड्राव (२) , पडोळकरवडी , शिरनांदगी , हुलजंती , शिवनगी , निंबोणी , चिक्कलगी या गावातील छावण्या बंद झाल्या आहेत. या नऊ छावण्यातील व इतर सुरू असलेल्या ५२ छावण्यातील मिळून सुमारे १२ हजाराहून अधिक जनावरे कमी झाली असून सध्या २५ हजार ५४८ जनावरे छावणीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज