मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील रमाकांत जोशी यांच्या शेतातील उसाच्या पिकात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे दरम्यान आहे . तो इसम उसाच्या पिकात मृतावस्थेत आढळून आला असून अंगात निळ्या रंगाचा शर्ट , चॉकलेटी रंगाची पॅन्ट आहे . उजव्या हाताच्या पोटरीवर बदाम चिन्ह असून त्यात एलएस लिहिलेले आहे.
त्याचे नातेवाईक आढळून आल्यास मंद्रूप पोलिसांशी संपर्क साधावा , असे आवाहन पोलीस हवालदार गोविंद राठोड यांनी केले.
विषारी औषध प्राशन माढा तालुक्यातील अंजनगाव येथे राहणाऱ्या नागेश मधुकर चौगुले ( वय २१ ) या तरुणाने ट्रॅक्टर घेण्याच्या कारणावरून आई , वडिलांशी भांडण करून रागाच्या भरात पिकावर फवारणीचे कीटकनाशक औषध प्राशन केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज