mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
उद्धव ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केल्यानंतर, त्यास काँग्रेसने तीव्र हरकत घेतली असून, महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष बसून सीएएबाबत जी भूमिका घेतील, ती सगळ्यांना मान्य असेल, असे विधान गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केले आणि एकप्रकारे ठाकरे यांच्या भूमिकेस हरकत घेतली. 

एनपीआर, एनआरसी आणि सीएए या तिन्ही कायद्यांना काँग्रेसचा विरोध असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सीएएच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत असलेली मतभिन्नता पुन्हा समोर आली.

ठाकरे यांच्या दिल्लीतील विधानावर काँग्रेसने आक्षेप नोंदविला. ‘ठाकरे यांनी जाहीरपणे काही बोलण्यापूर्वी हा कायदा नीट समजून घ्यावा,’ असा सल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दिला. तर सीएएचे जाहीर समर्थन ठाकरे यांनी करू नये, असे विधान माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तिवारी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ठाकरे यांनी सीएएबाबत नीट माहिती घेण्याची गरज आहे. २००३च्या कायद्यानुसार एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे. त्यामुळे एकदा एनपीआर लागू केला, तर एनआरसी रोखता येणार नाही. तसेच सीएए कायद्याकडे भारतीय घटनेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. कारण धर्माच्या आधारे नागरिकत्व दिले जाऊ शकत नाही.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम सकाळीच टिष्ट्वट करून असा चिमटा काढला की, महाराष्ट्रातील आमदारांचे सीएए, एनआरसीवरून अलिकडेच तज्ज्ञांमार्फत प्रबोधन करण्यात आले होते आणि या कायद्यांना विरोध करण्याबाबत त्यांची मानसिकता तयार करण्यात आली होती. मग आज काँग्रेस ज्या पक्षाला सरकारमध्ये पाठिंबा देतेय तो पक्ष या दोन्ही कायद्यांच्या विरोधात आहे, असे निरुपम म्हणाले.

तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील : गृहमंत्री
सीएए, एनआरसी बद्दल शरद पवार यांनी जी भूमिका घेतील तीच आमची सर्वांची भूमिका आहे. महाराष्ट्रात आता तीन पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एकाचेही नागरिकत्व यामुळे जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


भाजपवाले स्वप्न पाहत होते की त्यांचे सरकार येईल पण तसे झाले नाही, मुंगेरीलालसारखे स्वप्न पाहणे त्यांनी सोडले पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.

उद्धव यांना मी समजून सांगेन – पृथ्वीराज चव्हाण
या वादाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण एका मुलाखतीत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीएएबाबत कोणीतरी समजवावे लागेल. मला संधी मिळाली, तर मी त्यांना हे समजावेन, तर तिन्ही कायद्यांना असलेल्या विरोधाबाबत मित्रपक्ष शिवसेनेला आम्ही आधीही सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पवार यांची नाराजी?
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत यांच्यात वर्षा निवासस्थानी शनिवारी दुपारी अचानक बैठक झाली.सीएएबद्दल भूमिका जाहीर करताना मित्रपक्ष म्हणून आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, या शब्दांत पवार यांनी सदर बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.


या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक लवकरच होऊन, तीत सीएएबद्दल चर्चा होणार असल्याचे समजते. अजित पवार यांनी मात्र, ‘लोकमत’शी बोलताना त्याचा स्पष्टपणे इन्कार केला. विधिमंडळ अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक होती आणि ती पूर्वनियोजित होते, असे ते म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Mazaराजकीय

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
देवेंद्र फडणवीस पुन्हा येणारच : भय्याजी जोशी

देवेंद्र फडणवीस पुन्हा येणारच : भय्याजी जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा